विद्यापीठ चौकातील पूल पाडण्यापुर्वी अभ्यास करा

दुमजली उड्डानपूलराज्य सरकारची मान्यता ;२४० कोटी रुपये येणार खर्च पुणे : पुणे विद्यापीठ चौकात अस्तित्वात असलेला पुल पाडण्याएैवजी त्यावर अाणखी एक पुल बांधण्यासाठी तांत्रिक अभ्यास करावा अशी

दुमजली उड्डानपूल राज्य सरकारची मान्यता ; २४० कोटी रुपये येणार खर्च

पुणे : पुणे विद्यापीठ चौकात अस्तित्वात असलेला पुल पाडण्याएैवजी त्यावर अाणखी एक पुल बांधण्यासाठी तांत्रिक अभ्यास करावा अशी मागणी स्वंयसेवी संस्थेने केली अाहे.महापािलकेने  १५ वर्षांपूर्वी ४० कोटी  

रुपये खर्च करून िवद्यापीठ चाैकात उड्डाणपुल बांधला. हा  पूल पाडून नवीन २४० कोटी रुपये खर्चाचा दुमजली पूल बांधण्यास राज्य सरकारने मान्यता दिल्ाी अाहे.  नवीन उड्डाणपुलाच्या खर्चातील कोणताही वाटा राज्य सरकार उचलणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. याविषयी सजग नागरीक मंचचे विवेक वेलणकर यांनी तांत्रिक अभ्यास करण्याची मागणी केली अाहे.

 महापालिकेच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे हा भार परवडणार  का हा प्रश्न महत्वाचा ठरतो आहे. अंतिमतः हा भार पुणेकर नागरिकांवर येणार आहे.  मुळातच हे पूल न पाडता सुध्दा मेट्रो साठी आत्ताच्या पुलांवरून अजून एक पूल बांधणे शक्य असल्याचे मत काही तांत्रिक तज्ञांनी यापूर्वीच नोंदवले आहे.  आत्ताचे पूल पाडून संपूर्ण नवीन दुमजली पूल बांधायला या अति वर्दळीच्या रस्त्यावर २-३ वर्षे लागू शकतात ज्या काळात या रस्त्यावर ट्रॅफिक जाम मुळे जनतेच्या वेळ,  पैसा आणि इंधनाची शेकडो कोटी रुपयांची हानी होणार आहे ती वेगळीच.  त्यामुळे सध्याचे उड्डाण पूल न पाडता वरून नवीन पूल बांधण्याच्या कमी खर्चाच्या आणि कमी त्रासाच्या पर्यायाची तांत्रिक चाचपणी करून बघणे आवश्यक आहे.  हिमालयात अवघड परिस्थितीत रस्ते,  पूल बांधणी करणारी बाॅर्डर राेड अार्गनाझेशन ही संस्था  पुण्यात आहे. त्यांच्याकडून किंवा मुंबई आय आय टी कडून वा तत्सम अन्य संस्थेकडून याबाबत अभ्यास करून अहवाल मागवला तर कदाचित कोट्यावधी रुपयांची बचत होऊ शकते.   पूल पाडण्याचा पर्याय हा अखेरचा पर्याय म्हणून विचारात घ्यावा अशी मागणी वेलणकर यांानी केली अाहे.  राज्य सरकारने गणेशखिंड रस्ता-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि ई-स्क्वेअर हे दोन उड्डाणपूल पाडण्यासाठी मंजूरी दिली आहे. मात्र, ते पाडण्यापूर्वी वाहतुकीचे योग्य नियोजन करावे आणि नवीन पुलाचा आराखडा (डिझाईन) स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि तज्ज्ञ व्यक्तींसमोर सादर केले जावे अशी मागणी स्थानिक आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली आहे.ससुन रुग्णालयाला दिली भेट

पुणे : काेराेनाच्या िवराेधात लढणाऱ्यांना लागणारी मदत राज्य सरकार पाेचवित अाहे, तुम्ही काळजी घ्या असा अापुलकीचा सल्ला अामदार राेहीत पवार यांनी ससुन रुग्णालयात काेराेना िवभागात काम करणाऱ्यांना िदला.       कोरोनामुळे पुणे आणि मुंबईतील परिस्थिती चिंताजनक बनली आहे.वाढती रुग्णसंख्या आणि कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनस्तरावर शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.याच पार्श्वभूमीवर (दि.२७) रोजी राष्ट्रवादीचे नेते अािण कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी पुणे येथील ससुन हॉस्पिटलला भेट िदली. येथील रुग्णांशी संवाद साधला.यावेळी पवारांना अतिदक्षता विभागास आवर्जुन भेट िदली. तेथील गंभीर रुग्ण अािण कोरोनाशी लढा देत असताना संक्रमित झालेल्या डॉक्टर,नर्स,सुरक्षारक्षक आदींची भेट घेतली. ‘काळजी घ्या’ असा आपुलकीचा सल्ला दिला.यावेळी कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना भेटून त्यांच्या असणाऱ्या अडचणी व तेथील परिस्थितीही जाणून घेतली.उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राज्याबरोबरच पुणे येथील हॉस्पिटलवरही बारकाईने लक्ष आहे.कोरोना वॉरीयर्सना लागणारी मदतही ते पोहोचवत आहेत, असे पवार यांनी सांगितले.

      दरम्यान मानदेशी फाऊंडेशनच्या वतीने ससून हॉस्पिटलसाठी पी.पी.ई.किट, गॉगल व एन-९५ मास्क पवार यांचेकडे देण्यात आले होते.हे सर्व साहित्य ससुन हॉस्पिटलचे अधिष्ठाता  डॉ.मुरलीधर तांबे यांच्याकडे सुपूर्द केले.  यावेळी डॉ.योगेश गवळी, डॉ.हरीश ताटीया, डॉ.मुरलीधर बिरादार व इतर डॉक्टर,नर्स व कर्मचारी उपस्थित होते.