दिलासादायक! पुणे जिल्ह्यातील हॉटस्पॉट गावांची संख्या १५ ने घटली ; हॉटस्पॉट गावांची संख्या आज ८८ पर्यंत खाली

मेच्या तिसऱ्या आठवड्यापासून ग्रामीण भागातील बाधित संख्या कमी होत असल्यामुळे दि. १९ मे रोजी ही हॉटस्पॉट संख्या ३९७ पर्यंत खाली आली. तर, २ जून रोजी ती संख्या १८६ इतकी होती. दि. ९ जून रोजी जिल्हा परिषदेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात आठ दिवसात १०० ने हॉटस्पॉट गावांची संख्या कमी झाल्यामुळे दिलासा मिळाला होता.

    पुणे :  जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रात मागील महिनाभरापासून करोना संसर्ग कमी होण्याऐवजी वाढतच आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची डोकेदुखी आणखी वाढली. मात्र, मागील आठ दिवसांत ग्रामीणमधील हॉटस्पॉट गावांच्या संख्येत १५ ने घट झाली आहे. त्यामुळे आठ दिवसांपूर्वी शंभरीपार पोहचलेली हॉटस्पॉट गावांची संख्या आज ८८ पर्यंत खाली आली आहे. आजही त्यामध्ये जुन्नर, आंबेगाव, हवेली आणि पुरंदर तालुक्‍यात सर्वाधिक हॉटस्पॉट संख्या आहे.ज्या गावात दहापेक्षा जास्त करोना बाधित संख्या आहे, ते गाव हॉटस्पॉट म्हणून जाहीर कले जाते. दि. २८ एप्रिल रोजी ग्रामीणमधील सर्वाधिक ४६५ हॉटस्पॉट गावे होती.

    दरम्यान, मेच्या तिसऱ्या आठवड्यापासून ग्रामीण भागातील बाधित संख्या कमी होत असल्यामुळे दि. १९ मे रोजी ही हॉटस्पॉट संख्या ३९७ पर्यंत खाली आली. तर, २ जून रोजी ती संख्या १८६ इतकी होती. दि. ९ जून रोजी जिल्हा परिषदेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात आठ दिवसात १०० ने हॉटस्पॉट गावांची संख्या कमी झाल्यामुळे दिलासा मिळाला होता. मात्र, मागील तीन आठवड्यांपासून ग्रामीणमधील बाधित संख्या वाढल्यामुळे हॉटस्पॉट गावांची संख्याही झपाट्याने वाढू लागली. आठ दिवसांपूर्वी १०३ हॉटस्पॉट गावे होती, असे आरोग्य विभागाने सांगितले.

    १० जुलै रोजीची तालुकानिहाय हॉटस्पॉट गावांची संख्या
    जुन्नर २३, हवेली १२, आंबेगाव ११, पुरंदर १०, मावळ ०९, बारामती, खेड आणि शिरूर प्रत्येकी ०५, मुळशी आणि इंदापूर प्रत्येकी ०३, भोर ०२दौंड आणि वेल्हा प्रत्येकी -००