डेलोनिक्स सोसायटीच्या बारामती कॉलेज ऑफ फार्मासीच्या विद्यार्थ्यांचे यश

    बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन अंतर्गत घेण्यात येणाऱ्या डिप्लोमा इन फार्मसी परीक्षेमध्ये डेलोनिक्स सोसायटीच्या बारामती कॉलेज ऑफ फार्मसीच्या (Delonix Society’s Baramati College of Pharmacy) विद्यार्थ्यांनी मोठे यश संपादन केले.

    यामध्ये प्रथम वर्ष डी. फार्मसीचा निकाल ९८.५ टक्के लागला असून, अजय राजेंद्र साळुंखे (८५.८२ टक्के), पौर्णिमा सुनील जगताप (८५.७३ टक्के), निकिता जयराम पवार (८५.५५ टक्के) व जयश्री रुपचंद सातपुते (८५.५५ टक्के) अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.

    तसेच द्वितीय वर्ष डी.फार्मसीचा निकाल १०० टक्के लागला असून यामध्ये निनाद दत्तात्रय पवार (९२.३ टक्के), प्रीती शिवाजी रसाळ (८८.५‌ टक्के), स्नेहल जनार्दन मोठे (८७.३ टक्के) अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.
    यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे , प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील , प्रा. कविता माने, विभाग प्रमुख, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.