Success to follow up of Maval MLA Sunil Shelke, notification to transform Dehugaon Gram Panchayat into Nagar Panchayat

देहूगाव तिर्थक्षेत्र विकासासाठी देखील मोठ्या प्रमाणात निधी येत असल्याने याकरिता देहूगाव ग्रामपंचायतीचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सहभाग न करता स्वतंत्र नगरपंचायतमध्ये रुपांतर करा अशी देहूकरांची मागणी होती.

पिंपरी : जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज यांची जन्म व कर्मभूमी असलेल्या देहूगाव ग्रामपंचायतीचे ( Dehugaon Gram Panchayat ) देहू नगरपंचायतमध्ये (Nagar Panchayat) रुपांतर करण्यात आल्याची अधिसूचना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काढली आहे. मागील अनेक वर्षांच्या मागणीला मावळचे आमदार सुनिल शेळके ( MLA Sunil Shelke) यांच्या पाठपुराव्यामुळे यश आले आहे. या निर्णया मुळे देहूगावाचा विस्तार वाढत असल्याने ग्रामपंचायतीला नागरिकांना मुलभूत सुविधा देण्यात येत असलेल्या अडचणी दूर होतील, असा विश्वास आमदार शेळके यांनी व्यक्त केला आहे.

संत तुकाराम महाराज यांचे जन्म व कर्मस्थान असलेल्या देहू गावात तुकाराम बिजेच्या निमित्त लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात तसेच आषाढ वारीकरिता देशाच्या कानाकोपर्‍यातून पालख्या देहूनगरीत येत असतात. तसेच देहूगावाचा विस्तार वाढत असल्याने ग्रामपंचायतीला नागरिकांना मुलभूत सुविधा देण्यात अडचणी येत होत्या. देहूगाव तिर्थक्षेत्र विकासासाठी देखील मोठ्या प्रमाणात निधी येत असल्याने याकरिता देहूगाव ग्रामपंचायतीचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सहभाग न करता स्वतंत्र नगरपंचायतमध्ये रुपांतर करा अशी देहूकरांची मागणी होती.

सुमारे ३० हजार लोकसंख्या असलेल्या २०१२ सालापासून देहूगाव ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर करा अशी मागणी व वारंवार ग्रामपंचायत ठराव करण्यात आले होते. २०१६ साली या मागण्यांचा विचार करून तशी सूचना काढण्यात आली होती. आमदार सुनील शेळके यांनी त्याचा पाठपुरावा केल्यानंतर आता देहू नगरपंचायतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यानुसार नगरपंचायतीच्या सिमा निश्चित करण्यात आल्या आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मंत्रालयात देहू नगरपंचायतीची अधिसूचना आमदार सुनिल शेळके, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे यांच्याकडे सुपुर्द केली. यावेळी नगरविकास खात्याचे उपसचिव सतिश मोघे, विशाल महाराज मोरे, संजय महाराज मोरे, भानुदास मोरे, मा.सरपंच कांतीलाल काळोखे, रत्नमालाताई करंडे, मधुकर कंद, सचिन कुंभार, शंकर काळोखे, अभिमन्यू काळोखे, अभिजित काळोखे, विशाल काळोखे, सचिन काळोखे, राष्ट्रवादी काँग्रेस देहु शहराध्यक्ष प्रकाश हगवणे, युवक अध्यक्ष योगेश मोरे, योगेश परंडवाल, विकास कंद, उमेश मोरे, बापू म्हसुडगे व इतर मान्यवर उपस्थित होते.

- आमदार, सुनील शेळके