परदेशी शिक्षाणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अशी मिळणार लस

शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, १८ ते ४४ वर्षे वयोगटातील दुर्धर आजार असणाऱ्या व्यक्तींसाठी तसेच एक वर्षापेक्षा लहान बाळ असणाऱ्या स्तनदा मातांसाठी नवे लसीकरण केंद्र सुरू करण्याचे नियोजन आहे.

    पिंपरी: ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र, शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण केंद्र तसेच विशिष्ट व्यक्तींचे घरीच कोविड -१९ रोगप्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नियोजन केले असून यासाठी ‘मी जबाबदार’ या अधिकृत ॲपद्वारे येत्या १ जूनपासून नोंदणी करता येणार आहे, अशी माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.
    कोविड -१९ रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिम जलदगतीने राबविण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने नवीन ड्राइव्ह-इन लसीकरण केंद्र सुरु होणार आहे. ड्राईव्ह-इन लसीकरण केंद्र लोकांना वाहनांमधून बाहेर न जाता लस शॉट घेण्याची परवानगी देतो. शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, १८ ते ४४ वर्षे वयोगटातील दुर्धर आजार असणाऱ्या व्यक्तींसाठी तसेच एक वर्षापेक्षा लहान बाळ असणाऱ्या स्तनदा मातांसाठी नवे लसीकरण केंद्र सुरू करण्याचे नियोजन आहे.
    आजारामुळे अंथरुणावर असलेले रुग्ण तसेच गतिमंद व्यक्तींना त्यांच्या घरी जाऊन कोविड १९ रोग प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येणार आहे.