बाळ संगोपन रजेवर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांची गळफास लावून आत्महत्या ;  पोलीस दलात खळबळ

पूजा या पुणे ग्रामीण पोलीस दलात कॉन्स्टेबल होत्या. त्या दौड पोलीस ठाण्यात नेमणूकीस होत्या. दरम्यान सध्या त्या बाळ संगोपन रजेवर होत्या. धनकवडीत त्या पती व कुटुंबासोबत राहत होत्या. दुसऱ्या मजल्यावर त्यांचे पती व त्या राहत असत. तर खालच्या मजल्यावर कुटुंब राहत होते. जॉईंट फॅमिली होती.यादरम्यान रविवारी रात्री साडे दहा वाजता त्या त्यांच्या खोलीत गेल्या. परत न खाली न आल्याने पतीने वर जाऊन पाहिले. त्यांनी दरवाजा न उघडल्याने त्यांनी खिडकी फोडून पाहिले.

    पुणे : पुणे ग्रामीण पोलीस दलातील एका महिला कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पूजा दत्तात्रय कांबळे (वय २८, रा. धनकवडी) असे आत्महत्या केलेल्या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू केले आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा या पुणे ग्रामीण पोलीस दलात कॉन्स्टेबल होत्या. त्या दौड पोलीस ठाण्यात नेमणूकीस होत्या. दरम्यान सध्या त्या बाळ संगोपन रजेवर होत्या. धनकवडीत त्या पती व कुटुंबासोबत राहत होत्या. दुसऱ्या मजल्यावर त्यांचे पती व त्या राहत असत. तर खालच्या मजल्यावर कुटुंब राहत होते. जॉईंट फॅमिली होती.यादरम्यान रविवारी रात्री साडे दहा वाजता त्या त्यांच्या खोलीत गेल्या. परत न खाली न आल्याने पतीने वर जाऊन पाहिले. त्यांनी दरवाजा न उघडल्याने त्यांनी खिडकी फोडून पाहिले. तरीही त्या दिसत नसल्याने त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. यावेळी त्यांना गळफास लावून घेतल्याचे दिसून आले. त्यांनी पाहिले असता हात हलत होता. त्यामुळे त्यांनी तात्काळ भारती विद्यापीठ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण, डॉक्टरांनी त्याना मृत घोषित केले. यानंतर ससून रुग्णालयात नेण्यात आले. सहकारनगर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती घेतली आहे. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडला असवा असा संशय असल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक माहिती तपासानंतर समजेल, असे सांगण्यात आले.