शिक्रापूर येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या

शिक्रापूर : येथील पाबळ चौक परिसरातील जैन मंदिर जवळील एका घरात सदोतीस वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

                        शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पाबळ चौक परिसरातील जैन मंदिर जवळ राहणारे सुंदर चव्हाण हे दारू पिऊन घरी आले होते.  घरी आल्यानंतर सुंदर याने दारूच्या नशेत मुलांना मारहाण करत घराबाहेर काढले.  त्यांनतर सुंदर यांची पत्नी व मुले घराबाहेर बसले होते. त्यानंतर काही वेळाने सुंदर यांच्या पत्नीने घरामध्ये पाहिले असता त्यांना पती सुंदर याने गळफास घेतल्याचे दिसून आले. या घटनेमध्ये सुंदर पांडुरंग चव्हाण (रा. पाबळ चौक मलठण फाटा शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे)  याचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेत पंचनामा केला असून सदर इसमाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत अर्जुन पांडुरंग चव्हाण यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अनिल जगताप हे करत आहे.