प्रेयसीने केलेली फसवणूकीच्या नैराश्यातून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

रांच्या विरोधामुळे या तरुणीने पंकज याच्याशी संबंध तोडून टाकले. त्यामुळे प्रेमभंग झाल्याने पंकज हा पुण्यातील मारुंजी येथील ओयो फ्लॅगशीप हॉटेलमध्ये त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

    पिंपरी: तरुणीने प्रेमास नकार देऊन तिच्या नातेवाईकांनी शारीरीक त्रास दिल्याने एका तरुणाने पुण्यातील हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. पंकज श्रीकृष्ण उबाळे (वय २०, रा. वाघाळा, पो़ नागापुरता, परळी वैजनाथ, जि. बीड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी एकनाथ सावंत, सत्यजीत सावंत, उद्धव सावंत, अनिरुद्ध सावंत (सर्व रा. हेळंब, जि. लातूर) यांच्यासह एका तरुणीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

    याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज उबाळे याचे २०१९ पासून एका तरुणीवर प्रेम होते. याची माहिती तिच्या नातेवाईकांना माहिती झाल्यावर त्यांनी पंकज उबाळे याला मारहाण केली. घरांच्या विरोधामुळे या तरुणीने पंकज याच्याशी संबंध तोडून टाकले. त्यामुळे प्रेमभंग झाल्याने पंकज हा पुण्यातील मारुंजी येथील ओयो फ्लॅगशीप हॉटेलमध्ये त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी पंकज याने आपल्या मामाला व्हाट्सअ‍ॅप मेसेज केला. त्यात आपल्या प्रेयसीने आपल्यासोबत प्रेमभंग केला असून तिच्या नातेवाईकांनी शारीरीक त्रास दिल्याने आपण आत्महत्या करीत असल्याचे त्यात म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक एम. बी. गाढवे तपास करीत आहेत.