शिक्रापुरात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

शिक्रापूर : येथील त्रिमूर्ती कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका सव्वीस वर्षीय युवकाने राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

           शिक्रापूर (ता. शिरूर)  येथील त्रिमूर्ती कॉलनी येथील तृप्ती भुजबळ यांचा भाजीपाल व्यवसाय आहे.  सर्व भाजीपाला ते त्याच्या आईच्या घरामध्ये ठेवत असतात, शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास तृप्ती या आईच्या घरात भाजीपाला आणण्यासाठी गेल्या असताना घराचा दरवाजा बंद असल्यामुळे त्यांनी दरवाजा वाजविला परंतु त्यांना काहीही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून त्यांनी आतमध्ये पाहीले असता त्यांना घरामध्ये भाऊ तुषार हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला, त्यानंतर तेथील लोकांनी दरवाजा तोडून तुषार याला खाली घेत शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी तुषार वसंत भूमकर (वय २६ वर्षे रा. त्रिमूर्ती कॉलनी केनॉल रोड शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे)  यास मृत घोषित केले.  याबाबत तृप्ती काळूराम भुजबळ यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली असल्याने पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अनिल जगताप हे करत आहे.