विवाहित महिलेची आत्महत्या

पुणे : सासरच्या छळास कंटाळून विवाहित महिलेने आत्महत्या केली. याप्रकरणी कोथरुड पोलिस ठाण्यात पती आणी सासू साऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशा किसन चव्हाण(२७,रा.शास्त्रीनगर, कोथरुड)

पुणे :  सासरच्या छळास कंटाळून विवाहित महिलेने आत्महत्या केली. याप्रकरणी कोथरुड पोलिस ठाण्यात पती आणी सासू साऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशा किसन चव्हाण(२७,रा.शास्त्रीनगर, कोथरुड) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मृत महिलेच्या बहिणीने फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार आशाचा २०१५ मध्ये विवाह झाला होता. सासरी नांदत असताना तिला माहेरुन पैसे आणण्यासाठी पती आणि सासू-सासरे सातत्याने त्रास देत होते. अनेकदा तीचा मानसिक व शारीरीक छळ करण्यात येत होता. या छळास कंटाळून तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्यामागे एक अडीच वर्षाची मुलगी आहे. तर पती भाजी विक्रीचा व्यवसाय करतो. याप्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे करत आहेत.