सततच्या धमक्यांना कंटाळून तरुणाची आत्महत्या

पुणे: पूर्वी झालेल्या वादातून सतत येणाऱ्या धमक्यांच्या त्रासाला कंटाळून तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हडपसर परिसरात ही घटना घडली असून, पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. गणेश भीमा देवकुळे

पुणे: पूर्वी झालेल्या वादातून सतत येणाऱ्या धमक्यांच्या त्रासाला कंटाळून तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हडपसर परिसरात ही घटना घडली असून, पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. गणेश भीमा देवकुळे (वय ३७) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी याकुब मुस्तफा शेख (वय ६४), सलील याकुब शेख (वय २३), आतिफ याकुब शेख (वय २६) यांना अटक करण्यात आली. याबाबत ६० वर्षीय महिलेने हडपसर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. तक्रारदार महिला आपल्या मुलासह हडपसर परिसरात येथे राहतात. संबंधित आरोपी आणि फिर्यादी यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाले होते. याचा राग आरोपींच्या मनात होता. त्यांनी यावरून गणेश याला घरी बोलाविले. ‘या परिसरात रहायचे नाही. इथे राहिल्यास मारून टाकीन,’ अशी धमकी त्यांनी दिली. त्यानंतर आरोपी सतत त्याला त्रास देऊन शिवीगाळ करत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. या त्रासाला कंटाळून गणेश यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पुढील हडपसर पोलिस करत आहेत.