धनगर आरक्षणाची दिशा ठरविण्यासाठी रविवारी बैठक

भिगवण : धनगर आरक्षणाची (Dhangar Reservation) अंमलबजावणी करावी या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक होत असुन राज्यभरात आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी भिगवणला रविवारी २७ सप्टेंबर रोजी येथे राज्यव्यापी बैठक बोलावण्यात आल्याची माहिती डॉ.शशिकांत तरंगे यांनी दिली. यावेळी इंदापूर तालुक्यातील शिष्टमंडळाने आयोजित केलेल्या बैठकीत जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, माजी सरपंच तुकाराम बंडगर, आबा बंडगर, नाना बंडगर, अनिल तांबे, प्रदिप वाकसे, महेश शेंडगे, नामदेव पाटील अतुल देवकाते आदी उपस्थित होते.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेत दिलेल्या आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी सरकारने ७० वर्षांपासुन धनगर आणून धनगड असा “र” आणि “ड” चा खेळ मांडला असून समाजाचे नुकसान केले आहे देशातील अनेक राज्यात धनगरांना अनुसूचित जाती किंवा जमातीचे आरक्षण आहे मात्र महाराष्ट्रात समाज आरक्षणापासुन वंचित आहे. राज्यात धनगरांची दोन क्रमांकाची संख्या असतानाही समाज राजकिय व सामाजिक उद्देशांपासुन कोसो दुर आहे सत्तेवरील प्रत्येक सरकार फसवण्याची काम करत आहे यामुळे आगामी काळात आरक्षण मुळे पर्यंत आंदोलन न थांबवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

धनगर समाज एका झेंड्याखाली आणण्याचा हेतू साध्य करण्यासाठी भिगवण मधील बैठकीत चर्चा करण्यात आली आणि राज्यातील सर्व समाज बांधव २७ सप्टेंबर रोजी भिगवण मध्ये बोलवण्याचा निर्णय घेण्यात आला.समाजाने एकसंघपणे आंदोलन केली तर त्याची तीव्रता सरकारला जाणवेल आणि त्याची दखल घेतली जाईल असे आबा बंडगर पुढे बोलताना म्हणाले.