पोलीस अधीक्षक पाटील बनले पोलिसांसाठी कोरोना योद्धा

पाटील यांच्या तत्परतेने पुणे ग्रामीण मधील पोलीस सुरक्षित शिक्रापूर : सध्या कोरोना विषाणूचा सर्वत्र प्रादुर्भाव होत असताना अनेक मंत्री, लोकप्रतिनिधी तसेच काही जिल्ह्यांमधील पोलीस अधिकारी पोलीस

पाटील यांच्या तत्परतेने पुणे ग्रामीण मधील पोलीस सुरक्षित

शिक्रापूर :
सध्या कोरोना विषाणूचा सर्वत्र प्रादुर्भाव होत असताना अनेक मंत्री, लोकप्रतिनिधी तसेच काही जिल्ह्यांमधील पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी कोरोना बाधित होत असताना पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या तत्परतेने पुणे ग्रामीण मधील पोलीस सुरक्षित असून पोलीस अधीक्षक संदीप पाटील हे पोलिसांसाठी कोरोना योद्धा ठरले आहे.

देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातलेले असताना नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पोलीस प्रशासनावर आलेली असताना पुणे जिल्हा अतिशय खडतर परिस्थितीमध्ये होता त्यामुळे पोलीस प्रशासनला त्यामध्ये झोकून देणे गरजेचे असताना पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी स्वतः त्यामध्ये विशेष लक्ष दिले होते. पुणे ग्रामीण मधील सर्व पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कर्मचारी हे आपले कुटुंब असल्याचे समजून संदीप पाटील यांनी सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या आरोग्यासाठी विशेष प्रयत्न सुरु केले. कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन सुरु होताच संदीप पाटील यांनी पुणे ग्रामीण मधील सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी महिनाभर पुरेल इतक्या काही होमिओपॅथी औषध व गोळ्यांचे वाटप केले. आयुर्वेदिक पावडर देखील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना पाठवून दिले. पोलीस स्टेशन मध्ये औषध फवारणी मशीन तसेच तापमापक यंत्र देखील दिले दरम्यानच्या काळामध्ये पोलिसांसाठी ऑनलाईन ध्यानधारणा आणि आरोग्य विषयक तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घेण्यात आले. दररोज सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी यांच्याकडून पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्य विषयक विचारपूस केली जात आहे. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या विशेष प्रयत्नामुळे पुणे ग्रामीण पोलीस दलातील सर्व पोलीस अधिकारी व सदृढ असून दररोज आपले कर्तव्य पोलीस बजावत आहेत.पोलीस अधीक्षक संदीप पाटील साहेब हे आमची काळजी स्वतःच्या कुटुंबाप्रमाणे घेत असल्याचे सांगत शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांचे आभार मानले आहे.

– पुणे ग्रामीण मध्ये सर्व पोलीस सुरक्षित

पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी राबविलेल्या विशेष मोहिमेमुळे पुणे ग्रामीण पोलीस दलातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी सुरक्षित आणि सदृढ असून एकही पोलीस कोरोना बाधित नाही हि पुणे ग्रामीण पोलीस दलासाठी अभिमानाची बाब आहे.