खा सुप्रिया सुळे यांनी बारामती शहरातील एमईएस हायस्कुलच्या केंद्रात मतदानाचा हक्क बजावला.
खा सुप्रिया सुळे यांनी बारामती शहरातील एमईएस हायस्कुलच्या केंद्रात मतदानाचा हक्क बजावला.

बारामती : कोरोना महामारीनंतर अतिवृष्टी, या संकटातही राज्य सरकारने उत्तम काम केले असून केंद्राच्या अहवालातही राज्य सरकारच्या कामगिरीचे कौतुक केले आहे, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी बारामती शहरातील एमईएस हायस्कूल येथील मतदान केंद्रात खा सुळे यांनी आज (दि १) खा सुळे यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या, मागील वर्षभरात महाविकास आघाडीने खूप संघर्ष केला आहे. सुरुवातीला कोरोनाचे संकट, त्यानंतर अतिवृष्टी या दुहेरी संकटात उत्तम काम राज्य सरकारने केले आहे. देश-विदेशातून येणाऱ्या लोकांकडूनही महाराष्ट्राने उत्तम काम केल्याची पावती अनेक वेळा दिली आहे .विरोधकांकडे बोलण्यासारखे काहीच न राहिल्याने ते सातत्याने सरकार पडणार असल्याचा अफवा पसरवत आहेत. त्यांची पक्ष संघटना टिकवण्यासाठी व त्यांच्या कार्यकर्त्यातील उत्साह कमी झाला आहे, त्यामुळे ते सरकार पडणार पडणार असल्याचे वारंवार बोलतात, अशी टीका यावेळी खा सुळेंनी केली.

वीज बिलासंदर्भात पदवीधर व शिक्षक संघाचे मतदान झाल्यानंतर सरकारकडून काहीतरी ठोस निर्णय घेतला जाईल असे आश्वासन खा. सुळे यांनी यावेळी दिले.