supriya sule

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशबद्दल  खासदार सुप्रिया सुळे यांना विचारले असता, "सोशल समाज माध्यमांवरील बातम्या आणि वास्तव यात खूप अंतर आहे, समाज माध्यमांवरील सर्व बातम्या या खऱ्या नसतात" अस वक्तव्य पत्रकारांशी बोलताना केले आहे, यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकनाथ खडसे यांच्या प्रवेशबद्दल गोंधळ निर्माण झाला आहे,

रावणगाव : दौंड तालुक्यातील राजेगाव येथील ओढ्यात रात्रीच्या वेळेस पाण्याचा अंदाज न आल्याने बुधवार (ता.१४) रोजी संध्याकाळी आठच्या सुमारास दोन दुचाकीवरील खानोटाचे चार जण वाहून गेले होते. यामधील तीन मृतदेह शोधण्यास यश आले असून एक मृतदेह शोधण्याचे काम एन.डी.आर.एफ.चे पथक युद्ध पातळीवर करत आहे,

शुक्रवार (ता.१६) रोजी रात्री उशिरा खासदार सुप्रिया सुळे यांनी मृतांच्या घरी जाऊन कुटुंबाचे सांत्वन केले. यावेळी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशबद्दल  खासदार सुप्रिया सुळे यांना विचारले असता, “सोशल समाज माध्यमांवरील बातम्या आणि वास्तव यात खूप अंतर आहे. समाज माध्यमांवरील सर्व बातम्या या खऱ्या नसतात” अस वक्तव्य पत्रकारांशी बोलताना केले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकनाथ खडसे यांच्या प्रवेशबद्दल गोंधळ निर्माण झाला आहे.

यावेळी दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांनी नवराष्ट्रच्या बातमीची दखल घेत मळद येथील ६७ लाख निधी खर्च करून केलेल्या पाझर तलावाच्या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी खासदार सुळे यांच्याकडे केली आहे. तसेच राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार यांसह तालुक्यातील पदाधिकारी यांच्यासह दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत खडकी येथे आढावा बैठकस उपस्थित होते.

यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व राज्य सरकारकडून सर्व मदत केली जाईल असे आश्वासन दिले आहे. तसेच ज्या भागात शेतकऱ्यांचा सहकारी साखर कारखाना चालू करण्यासाठी राष्ट्रवादीला आंदोलन करावे लागत आहे. त्याच भागात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील शेतकरी सन्मान काढत आहेत. असे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.