Surekha Punekar to join NCP

लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर येत्या 16 सप्टेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत करणार प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपास्थितीत हा प्रवेश होणार आहे. मुंबईतील राष्ट्रवादी भवनामध्ये हा पक्षप्रवेशाचा सोहळा रंगणार आहे.

    पुणे : लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर येत्या 16 सप्टेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत करणार प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपास्थितीत हा प्रवेश होणार आहे. मुंबईतील राष्ट्रवादी भवनामध्ये हा पक्षप्रवेशाचा सोहळा रंगणार आहे.

    मी आतापर्यंत कलेची सेवा केली आहे. आता राजकारणात जाऊन जनतेची सेवा करायची आहे. महिलांचे प्रश्न,गोरगरिबांचे विविध प्रश्न असतील ते मला सोडवायचे आहेत. म्हणून मी राजकारणात येत आहे, असे पुणेकर यांनी म्हटले आहे.

    पुणेकर राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होती. जुलै महिन्यात त्यांनी स्वतः विधानसभेची निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते.