दरेकरवाडी गावातील २२६ कुटुंबांचे सर्वेक्षण

शिक्रापूर : दरेकरवाडी (ता. शिरूर) मध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमे अंतर्गत सुरु असलेल्या सर्वेक्षणमध्ये गावातील तब्बल २२६ कुटुंबियांची तपासणी करण्यात आली असून सदर सर्वेक्षणाला नागरिकांचा व ग्रामस्थांचा देखील उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.
दरेकरवाडी (ता. शिरूर) येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमे साठी चार आरोग्य पथके तैनात करण्यात आलेले होते. मोहीमध्ये प्रत्येक घरा घरा मध्ये जाऊन २२६ कुटुंबियांची तपासणी करण्यात आली असून १११ जणांचे स्व्याब तपासणी करण्यात आले आहे. तर यावेळी पंचायत समिती सदस्या अर्चनाताई भोसुरे, पोलीस पाटील पांडुरंग दरेकर, सरपंच प्रमिला दरेकर, माजी उपसरपंच हिरामण दरेकर, संपदा दरेकर, आरोग्य सेविका कल्याणी दीक्षित, अंगणवाडी सेविका मंदाकिनी दरेकर, मदतनीस ज्योती काशीकर, आरोग्य पर्यवेक्षक जालिंदर मारणे, गायकवाड मॅडम, शोभाताई ढमढेरे, जिल्हा परिषद शाळा दरेकरवाडी शिक्षक वृंद तसेच ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी यांचे विशेष सहकार्य ग्रामस्थांना मिळाले आहे.– ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य: हिरामण दरेकर
कोरोना काळामध्ये ग्रामस्थांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलेले असून ग्रामस्थांच्या सहकार्याने गावामध्ये कोरोना बाधितांची संख्या कमी आहे. ग्रामस्थांनी यापुढे देखील प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे असल्याचे सांगत नागरिकांना काही त्रास जाणवल्यास दुर्लक्ष न करता आरोग्य विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन माजी उपसरपंच हिरामण दरेकर यांनी केले आहे.