भोरमध्ये भाताच्या पिकाला जीवदान

खोळंबलेल्या लागवडी पुन्हा सुरू

भोर : मंगळवारपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील भाताच्या पिकाला जिवदान मिळाले आहे. तर खोळंबलेल्या लावण्या पुन्हा जोमाने सुरू झाल्यामुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. तीन आठवडयापासून पाऊस गायब झाल्यामुळे सुमारे तीस टक्के पेक्षा अधिक क्षेत्रावरील लावण्या खोळंबल्या होत्या तर लागवडी झालेल्या खाचरात पाणी नसल्यामुळे जमीनीला भेगा पडल्या होत्या. पीक वाया जाणार, उत्पादनांत घट होणार या विवंचनेत शेतकरीवर्ग होता.

-गावांत कांही घरात पावसाचे पाणी शिरले

 जोरदार पावसाच्या प्रतिक्षेत सर्वजण होते. सोमवारी रात्रीपासून पावसाला सुरवात झाली.म ंगळवारी दिवसभर सर्वत्र जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक ओढे, नाले भरून वाहू लागले. निरा नदीतून भरपूर पाणी वाहू लागले आहे. न-र्हे गावांत कांही घरात पावसाचे पाणी शिरले. भोर शिरवळ मार्गावर पहाटे भर पावसात आंब्याचे जुने झाड पडले. त्यामुळे सकाळी कामगार, दूध, तरकारी, इतरांची वाहतुक ठप्प झाली.

कोणीही झाड बाजूला करण्यासाठी पुढे येईना. अखेरीस जवळ राहणाऱ्या अलका दत्तात्रय चंदनशिव या जेष्ट महीलेने कु-हाडीने झाडाच्या फांदया एका बाजूने तोडायला सुरवात केली. त्यानंतर पाउण तासाने वाहतूकीस थोडी वाट मोकळी झाली अन्ा दोन्ही बाजूची वाहने मार्गस्त झाली. बुधवारी सकाळी गेल्या चोवीस तासांत भोर १२८, संगमनेर १३५, नसरापूर १०३, वेळू ९३, किकवी ८३,निगुडघर १६२,अंबवडे १४३, भोलावडे १३५ मी.मी पावसाची नोंद झाल्याचे महसूल विभागाने सांगितले. 

– भाताच्या ६५ टक्के लावण्या झाल्या

भाटघर  ४७.६१ तर निरा देवघर धरण ३४.९२ टक्के भरले आहे. मागील वर्षी चार आँगस्टलाच दोन्ही धरणे ओव्हर फ्लो झाली होती. खरीप पिकाखाली एकूण २०००० हेक्टर क्षेत्र आहे. त्यामध्ये भात ७५००, ज्वारी १००,बाजरी २००,रागी १५००,वरई ८००, तृणधान्य ७००,तूर २००,मूग ५०,उडीद १००, इतर कडधान्य ६५०, भूईमूग ४०००,तिळ १००,कारळा १००,उस ६००, भाजीपाला ८०० हेक्टर, सोयाबिन ३००० हेक्टरचा समावेश आहे. भाताच्या ६५ टक्के लावण्या झाल्या तर उर्वरीत पेरण्या उरकल्या आहेत.