आंबिल ओढा कारवाईला स्थगिती! ; स्थानिकांना न्यायालयाकडून दिलासा , प्रशासनाने घाई केल्याचा भाजपचा दावा

आंबील ओढ्यावर दांडेकर पुल येथे सुमारे साडे सहाशे घरे असून, यातील ओढ्याच्या पात्रालगत असलेल्या एकशे तीस घरांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. महापालिकेने मार्च महीन्यात यासंदर्भात जाहीर प्रकटनही दिले आहे.

    पुणे : आंबील ओढ्यातील अतिक्रमण झालेली घरे हटविण्यासाठी गेलेले महापािलका कर्मचारी , पाेलिस आणि स्थानिक नागरीक यांच्यात वाद झाला. अखेर न्यायालयाने कारवाई करण्यास स्थगिती दिल्याने रहीवाश्यांना दिलासा मिळाला आहे. तर ही कारवाई करण्यात प्रशासनाने घाई केल्याचा दावा सत्ताधारी भाजपने केला आहे. तर विराेधी पक्षाने यावर सत्ताधारी भाजपवर खापर फाेडले आहे.

    आंबील ओढ्यावर दांडेकर पुल येथे सुमारे साडे सहाशे घरे असून, यातील ओढ्याच्या पात्रालगत असलेल्या एकशे तीस घरांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. महापालिकेने मार्च महीन्यात यासंदर्भात जाहीर प्रकटनही दिले आहे. या भागातील रहीवाश्यांना राजेंद्र नगर येथील एका गृह प्रकल्पात तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरीत केले जाणार हाेते. यासंदर्भात दाेन दिवसांपुर्वी महापालिका प्रशासनाची संयुक्त बैठकही पार पडली हाेती. बुधवारी रात्रीपासून महापािलका प्रशासनाने या भागातील रहीवाश्यांना स्थलांतरीत करण्याची कारवाई सुरू केली हाेती. गुरुवारी सकाळी कारवाईचा वेग वाढल्यानंतर स्थानिक रहीवाश्यांनी विरोध करण्यास सुरुवात केली. पोलीस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांबराेबर त्यांचे वादही झाले. पोलिसांनी पन्नासहून अधिक नागरीकांना ताब्यात घेऊन कारवाई सुरू ठेवली. येथील रहिवाशी हनुमंत फडके यांनी न्यायालयात धाव घेऊन या कारवाईला स्थगिती मिळविली. न्यायालयाने याप्रकरणी महापािलकेला बाजू मांडण्याचे आदेश दिले आहे.