गंभीर गुन्हे कमी करून आरोपीला जामीनसाठी मदत केल्याप्रकरणी पिंपरीच्या पोलीस निरीक्षकासह उपनिरीक्षकाचे निलंबन

पोलीस निरीक्षक निकाळजे आणि उपनिरीक्षक जाधव यांनी कलम कमी करून आरोपींना जामीन मिळण्यास मदत केली आहे. गंभीर गुन्ह्या च्या तपासात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेऊन त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

पिंपरी: गंभीर गुन्ह्याचे कलम कमी करण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज सादर करत आरोपींना जामिनासाठी मदत केल्या प्रकरणी पिंपरीचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) आणि उपनिरीक्षक अशा दोन अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. तपासात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी याबाबतचा आदेश मंगळवारी रात्री उशिरा दिला आहे.

पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे आणि उपनिरीक्षक एस. एस. जाधव असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे आहेत. निकाळजे यांनी पिंपरीतील वाहनांची तोड़फोड़ च्या घटनेत आरोपींवर लावलेले कलम कमी करणेबाबत न्यायलायकडे लेखी अहवाल दिला. त्यानुसार न्यायालयाने आरोपींची जामिनावर सुटका केली. तसेच, उपनिरीक्षक जाधव यांनी देखील आरोपींवरील दरोड्याचे कलम कमी करणेबाबत न्यायलायकडे लेखी अहवाल सादर केला. त्यानुसार न्यायालयाने या प्रकरणातही आरोपींना जामीन मंजूर केला.

पोलीस निरीक्षक निकाळजे आणि उपनिरीक्षक जाधव यांनी कलम कमी करून आरोपींना जामीन मिळण्यास मदत केली आहे. गंभीर गुन्ह्या च्या तपासात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेऊन त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी या प्रकरणी काल रात्री कारवाई चे आदेश दिले. या आदेशामुळे शहर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे