रिव्हॉल्वरचा धाक दाखवून तरुणाला शिवीगाळ, पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

तरुणाला शिवीगाळ करून जात असलेल्या पाच जणांना जाब विचारल्याच्या कारणावरून पाच जणांनी तरुणाला रिव्हॉल्वर सारख्या हत्याराचा धाक दाखवून शिवीगाळ केली.

    पिंपरी: तरुणाला शिवीगाळ करून जात असलेल्या पाच जणांना जाब विचारल्याच्या कारणावरून पाच जणांनी तरुणाला रिव्हॉल्वर सारख्या हत्याराचा धाक दाखवून शिवीगाळ केली. ही घटना बुधवारी (दि. ७) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास रावेत – शिंदे वस्तीमध्ये घडली.

    रामेश्वर संभाजी भोंडवे (वय ३०, रा. शिंदेवस्ती, रावेत) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अनिल हुल्लावळे आणि त्याच्या चार साथीदारां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी बुधवारी दुपारी मोटारीतून आले. त्यांनी फिर्यादी भोंडवे आणि स्वप्निल केंजळे यांना शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपी निघून जात असताना फिर्यादी भोंडवे यांनी आरोपींना शिंदे वस्ती चौकात अडवले.

    तुम्ही आम्हाला शिवीगाळ का केली, असा जाब विचारला. यावरून आरोपी अनिल आणि त्याच्या चार साथीदारांनी भोंडवे यांना धक्काबुक्की केली. तसेच एकाने भोंडवे यांच्या छातीला रिव्हॉल्वर सारखे हत्यार लावले आणि पुन्हा शिवीगाळ केली. देहूरोड पोलिस तपास करत आहेत.