Swearing to go to Sasurwadi with a weapon in hand

जेजुरी :  पुरंदर तालुक्यातील भोसलेवाडी गावात एका जावयाचा हायव्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. बायको नांदायला येत नसल्याच्या कारणावरून या नवरदेवाने सासूरवाडीतच राडा घातला.

बायकोने तक्रारीवरून धिंगाणा घालणाऱ्या नवऱ्याविरोधात जेजुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप पांडुरंग मेमाने असे धिंगाणा घालणाऱ्या जावयाचे नाव आहे.

संदीप आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद झाल्याने ती माहेरी निघून गेली. काही दिवसांपासून ती माहेरीच राहत आहे. पत्नी नांदायला येत नसल्यामुळे संदीपने सासऱ्याच्या घरासमोर धिंगाणा घातला.

यावेळी त्याने पत्नीला लाकडी दांडक्याने मारहाण केली. यानंतर त्याने हातात कोयता घेऊन सासर्‍याला तुम्हाला कापून टाकतो आणि तुमची पोरगी घेऊन जातो अशी धमकीही दिली. त्याने पत्नीला शिवीगाळ करत तिच्यासह तीच्या सर्व माहेरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.