तडीपार आरोपीची पोलिसांना धक्काबुक्की

आरोपीपवन बंडु शिरसाठ याला पिंपरी - चिंचवड पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले. मात्र, तडीपारी आदेशाचा भंग करून शिरसाठ हा भोसरी परिसरात फिरत होता. पोलीस त्याला अटक करण्यासाठी गेले असता शिरसाठने पळून जाण्याचा प्रयत्न करत पोलिसांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली.

     

    पिंपरी: तडीपारीच्या आदेशाचा भंग करून उजळ माथ्याने फिरणाऱ्या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांना आरोपीने शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. ही घटना भोसरीतील बालाजीनगर झोपडपट्टीत घडली. पवन बंडु शिरसाठ (वय २२, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस हवालदार आनंद साळवी यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी शिरसाठ याला पिंपरी – चिंचवड पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले. मात्र, तडीपारी आदेशाचा भंग करून शिरसाठ हा भोसरी परिसरात फिरत होता. पोलीस त्याला अटक करण्यासाठी गेले असता शिरसाठने पळून जाण्याचा प्रयत्न करत पोलिसांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. फौजदार टोके तपास करत आहेत.