तडीपार गुन्हेगाराचे शहरात वास्तव्य; गुन्हेगारावर पोलिसांची कारवाई

पोलिसांनी या वर्षाच्या सुरुवातीला १३ सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. त्यात भोसरी पोलीस ठाण्यातील दोन गुन्हेगारांचा समावेश होता. आरोपी स्वप्नील आणि संतोष माने अशी त्यांची नावे आहेत. तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वीच स्वप्नील पिंपरी - चिंचवड शहरात कोणतीही परवानगी न घेता वास्तव्य करताना पोलिसांना आढळला.

    पिंपरी: पिंपरी – चिंचवड पोलिसांनी दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेला गुन्हेगार शहरात वास्तव्य करताना आढळला. त्यामुळे त्याला अटक करून त्याच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. स्वप्निल उर्फ सपन्या सुरेश भोई (वय १९, रा. शंकर काची चाळ, वॉर्ड नबर ३, दापोडी) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई सागर जाधव यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या वर्षाच्या सुरुवातीला १३ सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. त्यात भोसरी पोलीस ठाण्यातील दोन गुन्हेगारांचा समावेश होता. आरोपी स्वप्नील आणि संतोष माने अशी त्यांची नावे आहेत. तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वीच स्वप्नील पिंपरी – चिंचवड शहरात कोणतीही परवानगी न घेता वास्तव्य करताना पोलिसांना आढळला. त्याला अटक करण्यात आली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.