लॉकडाऊनचा निर्णय परत घ्या अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर

    पुणे : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे म्हणाले की, लोकांनी विरोध करण्यापूर्वी राज्य सरकारने लॉकडाऊनचा निर्णय परत घ्यावा. सरकारने निर्णय मागे घेतला नाही तर अनेक लोक दुकाने सुरु करायला लागतील. तेव्हा आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. सरकारला आम्हाला अटक करायची असेल तर करावी. पण आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, अशा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

    दरम्यांन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने विकेंड टाळेबंदी आणि कठोर निर्बंध लागू केले आहेत. पण प्रत्यक्षात सातही दिवस लॉकडाऊनची स्थिती निर्माण केली जात असल्याचा आरोप करत अनेक स्तरातून विरोध होत आहे. लोकांनी विरोध करण्यापूर्वी राज्य सरकारने लॉकडाऊनचा निर्णय परत घ्यावा. असं आंबेडकर म्हणाले.

      सरकारने लॉकडाऊनच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा – आंबेडकर

    “महाराष्ट्र सरकारच्या हलगर्जीपणामुळे कोरोनाचा प्रसार वाढत आहे. गेल्या वर्षी जे जम्बो कोविड सेंटर सुरुवातीला सरकार चालवत होते. ते नंतर खाबूगिरीसाठी नातेवाईक आणि एनजीओंना चालवायला दिले. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिक आणि छोटे व्यापारी, व्यावसायिक भरडले जात आहे. त्यामुळे सरकारने लॉकडाऊनच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा. अन्यथा राजकीय दृष्टीनेच विचार करावा लागेल. अशा ईशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.