कोरोनाचा रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा

संतोषकुमार देशमुख यांचे आवाहन

शिक्रापूर : दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून दररोज कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याची बाब चिंताजनक असून कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेऊन प्रभावी उपाययोजना कराव्यात असे आवाहन प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी केले आहे.

शिक्रापूर (ता. शिरूर) सह परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात कोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी नुकतीच शिक्रापूर ग्रामपंचायत कार्यालय येथे ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांची बैठक घेतली. यावेळी शिरूर पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी बाळासाहेब ढवळे पाटील, शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे, पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ प्रज्ञा घोरपडे, शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैजिनाथ काशिद, तलाठी अविनाश जाधव, ज्ञानदेव बराटे, सरपंच हेमलता राऊत उपसरपंच जयश्री दोरगे, माजी सरपंच जयश्री भुजबळ, रामराव सासवडे, उपसरपंच जयश्री दोरगे, माजी उपसरपंच आबाराजे मांढरे, नवनाथ सासवडे, सागर सायकर, सुजाता खैरे, अनिता दिघे, दत्तात्रय गिलबिले, ग्रामपंचायत सदस्य रोहिणी गिलबिले, मिना सोंडे, गौरव करंजे, निलेश थोरात, आरोग्य पर्यवेक्षक जालिंदर मारणे यांसह आदी उपस्थित होते.

-दुकानदारावर कठोर कारवाई करावी

 यावेळी बोलताना ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील सर्व दुकानदारांना सार्वजनिक अंतर पाळण्याचे तसेच मास्क वापरण्याबाबत नमूद करून तसे न केल्यास त्यांच्यावर प्रथम दिवशी पाचशे रुपये दुसऱ्या दिवशी एक हजार रुपये दंड आकारावा त्यांनतर देखील बदल न झाल्यास दुकानदारावर कठोर कारवाई करावी असे सांगितले असून परिसरातील ज्या कंपनीमध्ये जास्त प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत त्यांना आरोग्य विभागाने नोटीस बजाविण्याचे आवाहन केले असून शिरूर तालुक्यात कार्यरत भरारी पथकाने सतर्क होऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी असे देखील सांगितले आहे. तसेच सर्व ग्रामपंचायतींनी पोलिसांच्या मदतीने मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करावी यासाठी पोलिसांची मदत देणार असल्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी संगितले आहे.