टाकळीहाजी व निघोजच्या कन्या देत आहे कोरोनाशी लढा

कवठे येमाई : कोरोना महामारीमुळे संपुर्ण जग हे कोरोनाशी लढा देत आहे.यामध्ये प्रामुख्याने प्रशासन ,डाँक्टर ,पोलिस,नर्स,सफाई कामगार आदि देशसेवा म्हणून आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत आहे.या कर्तव्यामध्ये टाकळीहाजी (शिरुर ) व निघोज ( पारनेर) या दोन गावातील चार कन्या जिवाची बाजी लावून कोरोना योध्दा म्हणून पुणे येथिल विविध रुग्णालयात आपले देशसेवेचे व्रत प्रामाणिकपणे निभावत आहे.यामध्ये दोन कन्या पुणे येथिल ससून जनरल रुग्णालयात तर एक पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरु रुग्णालयात तर एक चांडोली( खेड) येथिल उपजिल्हा ग्रामिण रुग्णालयात आपले कर्तव्य निभावत आहे.

           माळवाडी ( टाकळीहाजी ) ता. शिरूर येथील शेतकरी कुटुंबातील कालिका रामचंद्र भाकरे ह्या सध्या ससुन जनरल हॉस्पिटल येथे स्टाफ नर्स म्हणून गेली १२ वर्षे काम करत आहेत पती लोणी काळभोर येथे खाजगी कंपनीत नोकरी करत आहे परंतु लॉकडाऊन काळात कंपनी बंद असल्याने ते गावी आई समवेत अकरा व पाच वर्षांच्या मुलांना सांभाळत आहे तर कालिका भाकरे  या कोरोना ड्युटीवर स्टाफ नर्स म्हणून कोरोना रुग्णांची सेवा  करत आहेत. त्यांच्या या धैर्याचे शिरुर तालूक्यातून कौतूक होत आहे.देशावर आलेल्या कोरोना महामारीत अनेकांना या रोगाने जीव गमवावा लागत आहे.परंतू या चारही कन्या  देशसेवेसाठी आपले कर्तव्य निभावत आहे. 
छाया भाऊ रसाळ या निघोज येथील असून त्या ग्रामीण रुग्णालय चांडोली येथे गेल्या १२ वर्षांपासून स्टाफ नर्स म्हणून कार्यरत आहेत.रसाळ यांचे पती लोणी काळभोर येथे खाजगी कंपनीत नोकरी करत असुन त्यांना दोन मुले आहेत एक मुलगा माहेरी आईकडे आहे तर एक मुलगा दहावीत शिकत असल्याने बरोबर आहे
तर पुष्पा बाबाजी लाळगे  व  जयश्री बाबाजी लाळगे या दोन्ही सख्या बहिणी असून त्यांचे माहेर निघोज (ता.पारनेर )आहे. जयश्री यांचे सासर राजूरी (ता.जुन्नर ) तर पुष्पा यांचे सासर अळकुटी (ता.पारनेर ) आहे. पुष्पा लाळगे ही ससुन जनरल हॉस्पिटल पुणे येथे गेल्या अकरा वर्षापासून स्टाफ नर्स म्हणून काम करत असून त्यांना दोन मुले आहेत तर  जयश्री लाळगे ही पुणे येथिल कमला नेहरु रुग्णालयात गेली ६ वर्षापासून स्टाफ नर्स म्हणून काम  त्यांना १२ वर्षाचा  मुलगा आहे.  कोरोना सुरू झाल्यापासून  दोन्ही बहिणींची मुले आपल्या आईवडिलांकडे निघोज या गावी असून आजी आजोबा  या मुलांचा  सांभाळत करीत आहे.पुष्पाचा  पती हे पुण्यात इंटीनिअरचे काम करत आहे..
 
कोरोनाची ड्यूटी अतिशय दक्षितेची…
कोरोना रुग्णांकरीता या स्टाफ नर्स जेव्हा डयूटी करतात तेव्हा त्यांना अतिशय काळजीपूर्वक रुग्णांची सेवा करावी लागते.प्रोटेक्टीव कीट परीधान केल्यानंतर आठ तास अन्न व पाणी पुर्णपणे वर्ज्य करावे लागत असून कोरोनाचा संसर्ग होवू नये म्हणून अतिशय काळजीपूर्वक काम करावे लागते व आठवडाभर ड्यूटी केल्यानंतर रुग्णालयाने बुक केलेल्या हाँटेलमध्ये ७ दिवस क्वारंटाईन राहावे लागते.मुलांची आठवण खुप येते परंतु आपल्यामुळे कुटूबांला बाधा होवू नये म्हणून संघर्ष करुन ही सेवा पार पाडावी लागत असल्याचे या कन्यांनी सांगितले .
कोरोना संसर्गापासून बचाव करणे हे अतिशय उत्तम आहे.आपण आपली स्वतःची काळजी घेवुन कोरोनापासून संरक्षण कसे होईल  व त्याकरिता मास्क, सँनिटायझर अशी प्रतिबंधकात्म साहित्य वापरुन वेळोवेळी आपले हात स्वच्छ धुवावेत .प्रत्येकाने स्वतः ची व कुटूबांची काळजी घेतल्यास लवकरच देश कोरोनामुक्त होईल अशी अपेक्षा या कोरोना वाँरियर्सने  बोलताना व्यक्त केली.