तळेगाव दाभाडे शहरात कडकडीत बंद

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे शहर परिसरात जनता कर्फूच्या पहिल्या दिवशी तळेगाव शहरात कडकडीत बंद ठेण्यात आले होते. कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी तळेगाव दाभाडे नगर परिषद, शहर समन्वय समिती, किराणा असोशिएशन आणि भाजीपाला व्यापारी यांच्या सहमतीने ठरविण्यात आल्याप्रमाणे तळेगाव दाभाडे शहर परिसरात दि. १६, १७ व १८ एप्रिल रोजी (गुरुवार ते शनिवार) तळेगाव शहर पुर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. या तीन दिवसाच्या जनता कर्फूच्या पहिल्या दिवशी तळेगाव शहरात कडकडीत बंद ठेण्यात आले होते.

 तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे शहर परिसरात जनता कर्फूच्या पहिल्या दिवशी तळेगाव शहरात कडकडीत बंद ठेण्यात आले होते. कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी तळेगाव दाभाडे नगर परिषद, शहर समन्वय समिती, किराणा असोशिएशन आणि भाजीपाला व्यापारी यांच्या सहमतीने ठरविण्यात आल्याप्रमाणे तळेगाव दाभाडे शहर परिसरात दि. १६, १७ व १८ एप्रिल रोजी (गुरुवार ते शनिवार) तळेगाव शहर पुर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. या तीन दिवसाच्या जनता कर्फूच्या पहिल्या दिवशी तळेगाव शहरात कडकडीत बंद ठेण्यात आले होते. या जनता कर्फूच्या कालावधीमध्ये सकाळी दुग्ध व्यावसयिक तसेच पूर्णवेळ दवाखाने व मेडिकलची दुकाने चालू ठेवण्यात आली होती. तळेगाव दाभाडे गावभागात पोलीससूत्राकडून लींबफाटा ते जिजामाता चौक ते तळेगाव स्टेशन अशी एकेरी वाहतूक करण्यात आली असून संभाजी नगरकडे, कडोलकर कॉलनीकडे,मारुती मंदिर चौकातून बाजार पेठेकडे, भाजपा कार्यालय समोरील रस्ता तसेच तळेगाव स्टेशन येथील एमएससीबी कडे जाणारा रस्ता वाहतुकीला पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.