जिवाहुन प्यारा रे तुच माझा यारा, फक्त तुझ्यासाठी दंड भरेन कितीही वेळा

शहरातील नाशिक (Nashik) फाटा ते चाकण तसेच शिक्रापूर ते चाकण आणि तळेगाव दाभाडे ते चाकण या मार्गांसह काही रस्त्यांवर अपघातांचे प्रमाण जास्त आहे. यात दुचाकीचालकांचा अपघात (Accident) होऊन प्राणांतिक अपघात तसेच गंभीर दुखापतीचे अपघात होत आहेत.

पिंपरी : एखादी वाहन चालवताना मोबाईलवर (Mobile) बोलणे आणि मग अनेक प्रकारचे अपघात (Accident) होणे, अशा घटना घडत असतात. वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे कायद्याने गुन्हा (Crime) असून वाहनचालक त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यानंतर वाहतूक पोलिसांकडून (police) दंडात्मक कारवाई केली जाते. तरीही दंडाची भिती न बाळगता मोबाईलवर बोलत असल्याचे दिसून येते.

शहरातील नाशिक (Nashik) फाटा ते चाकण तसेच शिक्रापूर ते चाकण आणि तळेगाव दाभाडे ते चाकण या मार्गांसह काही रस्त्यांवर अपघातांचे प्रमाण जास्त आहे. यात दुचाकीचालकांचा अपघात (Accident) होऊन प्राणांतिक अपघात तसेच गंभीर दुखापतीचे अपघात होत आहेत. ते अपघात रोखण्यासाठी वाहतूक नियम पालन करण्याचे पोलिसांकडून आवाहन केले जाते. मात्र तरीही त्याकडे दुर्लक्ष करून वाहने चालविली जातात.

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून इ-चालानच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई केली जाते. त्यानुसार २०० रुपये दंड आकारण्यात येतो. दंडाची ही रक्कम वाहनचालकांना ऑनलाईन पद्धतीने भरावी लागते. चौकाचौकांत सीसीटीव्ही कॅमेरे लावले असून, त्यामाध्यमातूनही कारवाई करण्यावर वाहतूक पोलिसांचा भर आहे.