सरकारने ठरवून दिलेल्या वयोमर्यादा आधीच लसीकरण करून घेतलेला तन्मय आरोग्य कर्मचारी..? ; माहिती अधिकारातून धक्कादायक बाब उघड

बारामती तालुक्यातील सोमेश्वर परिसरातील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी याबाबत मुंबईतल्या सेव्हन हिल्स हॉस्पिटल कडे माहिती मागवली होती. त्यानुसार हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहिती नुसार तन्मय फडणवीस यांनी १३ मार्च ला कोविड प्रतिबंधक लस घेतली असून रजिस्टर ला हेअल्थकेअर वर्कर अशी नोंद करण्यात आली आहे.

    वसंत मोरे , माळेगाव : तन्मय फडणवीस आठवतोय ना.. याच नावामुळे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. सरकारने ठरवून दिलेल्या वयोमर्यादेत बसत नसतानादेखील कोविड प्रतिबंधक लस घेतल्याच्या प्रकारानंतर आता पुन्हा एकदा तन्मय चर्चेत आला आहे. लस घेताना तसं महिने हेल्थ वर्कर असल्याची नोंद केल्याची धक्कादायक प्रकार माहिती अधिकारातून समोर आलाय.

    बारामती तालुक्यातील सोमेश्वर परिसरातील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी याबाबत मुंबईतल्या सेव्हन हिल्स हॉस्पिटल कडे माहिती मागवली होती. त्यानुसार हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहिती नुसार तन्मय फडणवीस यांनी १३ मार्च ला कोविड प्रतिबंधक लस घेतली असून रजिस्टर ला हेअल्थकेअर वर्कर अशी नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, तन्मय हा आरोग्य कर्मचारी असल्याची नोंद कुठेही आढळत नाही. मुळात तन्मय याच्या ट्वीटर हँडलवर तन्मय याने ऍक्टर असा उल्लेख केला आहे. त्यामुळे तन्मय चे लसीकरण वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

    देशात १ मे पासून १८ ते ४४ या वयोगटाचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. त्याआधी आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स तसेच ६० वर्षांवरील नागरिक आणि ४५ ते ६० या वयोगटातील सहव्याधीग्रस्त नागरिक यांच्या लसीकरणास परवानगी देण्यात आली होती. असे असताना तन्मय फडणवीस याने १ मेच्या आधीच १३ मार्चला लसीकरणाचा डोस घेतल्याचे स्पष्ट झाले होते. तन्मय याने पहिला डोस मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात तर दुसरा डोस नागपूर येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युट येथे घेतला होता. २० एप्रिल रोजी एक फोटो व्हायरल झाल्याने ही बाब पुढे आली होती. त्यावरून बरंच वादळ उठलं होतं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने यावर तीव्र आक्षेप घेत चौकशीची मागणी केली होती. त्याचवेळी देवेंद्र फडणवीस यांनी तन्मय हा दूरचा नातेवाईक असल्याचे सांगत त्याने लस नेमकी कशी घेतली हे आपणास माहीत नसल्याचे सांगितले होते. मात्र, माजी मंत्री शोभा फडणवीस यांचे नातू आणि देवेंद्र फडणीस यांचे पुतणे तन्मय याने राजकीय वशिला वापरून लसीकरण करून घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. या सर्व पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्या मुंबईच्या अडचणीत वाढ होणार हे नक्की.