शिक्षकांनी २००० जणांना केले होमिओपॅथीक गोळयांचे वाटप

ओतूर: आपल्या देशावर कोरोना या जागतिक महामारीचे संकट आले आहे. या संकटाचा सामना करत असताना यामध्ये शिक्षकांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे.

 सामाजिक बांधिलकीचे शिक्षकांनी घडविले दर्शन :आमदार बेनके

ओतूर: आपल्या देशावर कोरोना या जागतिक महामारीचे संकट आले आहे. या संकटाचा सामना करत असताना यामध्ये शिक्षकांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. आपल्या आरोग्याची पर्वा न करता शिक्षक प्रत्येक घरी जाऊन दैनंदिन कोरोना सर्वेक्षण, चेक पोस्ट ड्युटी, रेशनिंग वाटप यासारखी कामे करत आहेत. हे करत असताना आपले विदयार्थी व पालक त्याचबरोबर पोलीस यांचे आरोग्य चांगले रहावे, रोग प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून शिक्षकांनी स्वनिधीतून २००० जणांना अरसेनिक अल्बम ३० या होमिओपॅथीक औषधाचे वाटप केले. खऱ्या अर्थाने शिक्षकांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. शिक्षकांच्या या कार्याला सलाम,अशा आशयाचे उद्गार जुन्नरचे आमदार अतूल बेनके यांनी शिक्षकांबदद्ल काढले.
ग्राम विकास मंडळ ओतूर संचलित चैतन्य विद्यालय ओतूर मधील शिक्षकांनी स्वनिधीतून २००० विद्यार्थी, पालक व पोलीस कर्मचारी यांना रोगप्रतिकारशक्ती वाढविणारे भारत सरकार आयुष मंत्रालय, नवी दिल्ली यांनी सुचविलेले अरसेनिक अल्बम ३० या होमिओपॅथीक औषधाचे वाटप करण्यात आले. यावेळी सोशल डिस्टसिंग नियमांचे पालन करुन छोटया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रातिनिधीक स्वरूपात काही पालकांना जुन्नरचे आमदार अतूल बेनके, सुधाकर डुंबरे, ओतूर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक परशूराम कांबळे, जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, जुन्नरचे सभापति विशाल तांबे,ओतूरचे सरपंच संतोष तांबे आणि ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष अनिल तांबे यांच्या हस्ते करण्यात आले,अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पानसरे यांनी दिली.