तहसिलदाराच्या वाहनचालकाची आत्महत्या

दिक्षित हे पुणे शहराच्या तहसिलदार तृप्ती कोलते यांच्या सरकारी वाहनावर चालक म्हणून काम करतात. गेल्या तीन-चार दिवसांपासून तब्येत ठिक नसल्याने ते कामावर जात नव्हते. गुरूवारी दुपारी दिक्षित यांच्या पत्नीने त्यांना जेवण करण्यासाठी बोलवले. मात्र, दिक्षित घराच्या वरच्या खोलीत गेले. बराच वेळ होऊनही ते खाली न आल्याने कुटूंबियांनी दरवाजा वाजवून पाहिला.

    पिंपरी : पुणे शहराच्या तहसिलदार तृप्ती कोलते यांच्या वाहनचालकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार गुरूवारी (दि. १७) दुपारी तीनच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.अरूण मधुकर दिक्षित (वय ५०, रा. मधुबन सोसायटी, जुनी सांगवी) असे आत्महत्या केलेल्या वाहन चालकाचे नाव आहे. सांगवी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी याबाबत माहिती दिली.

    दिक्षित हे पुणे शहराच्या तहसिलदार तृप्ती कोलते यांच्या सरकारी वाहनावर चालक म्हणून काम करतात. गेल्या तीन-चार दिवसांपासून तब्येत ठिक नसल्याने ते कामावर जात नव्हते. गुरूवारी दुपारी दिक्षित यांच्या पत्नीने त्यांना जेवण करण्यासाठी बोलवले. मात्र, दिक्षित घराच्या वरच्या खोलीत गेले. बराच वेळ होऊनही ते खाली न आल्याने कुटूंबियांनी दरवाजा वाजवून पाहिला. परंतु, प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा तोडला असता दिक्षित गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. सांगवी पोलीस तपास करत आहेत.