पुणेकर गारठले!; पारा १०.४ अंशांवर

पुणे : पुण्यात रविवारी सकाळी या वर्षांतील सर्वांत कमी १०. ४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दिवसभर गारवा आणि संध्याकाळनंतर वाढत गेलेल्या थंडीच्या कडाक्याने रविवारी पुणेकर गारठले.

पुणे : पुण्यात रविवारी सकाळी या वर्षांतील सर्वांत कमी १०. ४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दिवसभर गारवा आणि संध्याकाळनंतर वाढत गेलेल्या थंडीच्या कडाक्याने रविवारी पुणेकर गारठले.

राज्यात रविवारी सकाळी साडेआठपर्यंत सर्वाधिक थंडी पुण्यात असल्याची नोंद हवामान खात्यात झाली. शिवाजीनगर येथील वेधशाळेत १०.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पुढील दोन दिवसांमध्ये हवेतील गारठा कायम राहील, असा अंदाजही हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला. बुरेवी चक्रीवादळानंतर शहर आणि परिसरातील आकाश मुख्यतः निरभ्र झाले. त्यामुळे उत्तरेतून राज्याच्या दिशेने वाहणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढला. त्याचा थेट परिणाम पुण्यासह राज्यातील बहुतांश भागात किमान तापमानाचा पारा कमी झाला, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली.

पुण्यात रविवारी सकाळपर्यंत किमान तापमान दोन अंश सेल्सिअसने कमी होऊन १०.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले.कमाल तापमानाचा पारा मात्र सरासरीच्या जवळपास म्हणजे २९.७ अंश सेल्सिअस नोंदला गेला. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान पुण्यात नोंदविले असल्याचे खात्यातर्फे सांगण्यात आले.राज्यात थंडी वाढली बंगालच्या उपसागरात गेल्या आठवडाभर धुमाकूळ घातलेल्या बुरेवी चक्रीवादळाचे उत्तरेकडून बाष्प ओढून घेतल्याने राज्यातील काही भागात थंडी वाढली आहे. मध्य महाराष्ट्रासह, मराठवाडा व विदर्भात काही भागांत थंड वाऱ्यामुळे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे.