दोन दिवसाच्या पावसानंतर तापमानात घट

पुणे : दोन दिवसांच्या दमदार हजेरीनंतर पुणे शहर आणि परिसरात पावसाने शुक्रवारी दिवसभर उघडीप दिली .अधूनमधून ढगाळ हवा राहिली तरी वातावरणात फारसा फरक झाला नाही . राज्यात गेल्या २४ तासात कोकणासह मध्य

पुणे : दोन दिवसांच्या दमदार हजेरीनंतर पुणे शहर आणि परिसरात पावसाने शुक्रवारी दिवसभर उघडीप  दिली .अधूनमधून ढगाळ हवा राहिली तरी वातावरणात फारसा फरक झाला नाही . राज्यात गेल्या २४ तासात कोकणासह मध्य महाराष्ट्र ,विदर्भ मराठवाडा विभागात हजेरी लावली. राज्यात चंद्रपूरमध्ये सर्वात जास्त म्हणजे ३८ अंश से कमाल तापमानाची नोंद झाली आहे 

दरम्यान, मान्सूनने केरळ ,कर्नाटकचा काही भाग ,बंगालच्या उपसागर आणि मध्य अरबी समुद्रात हजेरी लावली आहे. आगामी दोन दिवसात राज्याच्या काही भागात पावसाचा अंदाज हवामान खात्याने  वर्तवला आहे  पुण्यात आज ३१ अंश से कमाल तापमानाची नोंद झाली असून विदर्भातील काही जिल्ह्यात ३२ ते ३८ अंश से पर्यंत कमाल तापमानाची नोंद झाली आहे तर मराठवाड्यात ३५ ते ३६ अंश से पर्यंत कमाल तापमानाची नोंद झाली आहे असे खात्याच्या वतीने सांगण्यात आले आहे