जेसीबी चालकाच्या निष्काळजीपणामुळे भीषण अपघात

पिंपरी – जेबीसी चालकाच्या निष्काळजीपणामुळे एकाचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी सकाळी आनंदनगर येथील जुनी सांगवी येथे घडली. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच या जेसीबी चालकाला अटक करण्यात आली आहे.   

मिळालेल्या माहितीनुसार, जेसीबी चालवणाऱ्या चालकाचे नाव रमेश सुखदेव मुसळे असे आहे. तर जखमी व्यक्तीचे नाव निलेश तिडके असे आहे. बुधवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास निलेश तिडके त्यांच्या दुचाकीवरून कामाला जात होते. परंतु, जुनी सांगवी येथील स्टॅंपवेंडर ऑफिसच्या समोर आले असता एक जेसीबी चालक जेसीबीच्या साहाय्याने एक मोठा सिमेंटचा पाईप घेऊन कुठलीही खबरदारी न घेता अचानक रस्त्यावर आला. त्यानंतर सिमेंटच्या पाईपचा तिडके यांच्या हेल्मेटला धक्का लागला. या धक्क्यामुळे ते रस्त्यावरती पडले आणि गंभीर जखमी झाले.

दरम्यान, तिडके यांनी पोलिसांनी ठाण्याच धाव घेऊन, त्यांनी जेसीबी चालकाविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या घटनेची चाचपणी केली असता, आरोपी जेसीबी चालक रमेश मुसळे यांना अटक करण्यात आली आहे.