पुण्यातील नवले ब्रिज परिसरात भीषण अपघात; ट्रकची ७ ते ८ वाहनांना धडक

कात्रजकडून नवले ब्रिजकडे (Navale Bridge in Pune ) येत असताना मालवाहतूक ट्रकवरचा (Truck) ताबा सुटल्यामुळे भरधाव ट्रकने सात ते आठ वाहनांना धडक दिली. ज्यामध्ये सहा जण जखमी (6 Injured) झालेत. घटनास्थळी लगेचच वाहतूक पोलीस (Police) दाखल झाले. यात एक महिला गंभीर जखमी झाली आहे.

पुणे: पुण्यातील नवले ब्रिज परिसरात एका भरधाव(Accident In The Pune Navale Bridge Area) ट्रकने ७ ते ८ वाहनांना उडविल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अपघातात ६ जण जखमी ( Injured ) झालेत. तसेच घटनास्थळी भारती विद्यापीठ पोलीस आणि वाहतूक विभागाच्या पोलिसांनी (Police of Bharati University and Traffic Department) वाहने बाजूला करण्याचे काम सुरू केले.

मिळालेल्या माहितीनुसार, कात्रजकडून नवले ब्रिजकडे येत असताना मालवाहतूक ट्रकवरचा ताबा सुटल्यामुळे भरधाव ट्रकने सात ते आठ वाहनांना धडक दिली. ज्यामध्ये सहा जण जखमी झालेत. घटनास्थळी लगेचच वाहतूक पोलीस दाखल झाले. यात एक महिला गंभीर जखमी झाली आहे. तर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारती विद्यापीठाचे पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत.

दरम्यान, या मालवाहतूक ट्रकने आठ वाहनांना धडक दिली असून, त्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. जखमींना जवळच्याच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नवले ब्रिजवर वारंवार अपघात होत असतात. यापूर्वीसुद्धा अशाच पद्धतीनं अनेक वाहनांना धडक देण्याचा विचित्र अपघात घडला होता.