पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; दोघे जागीच ठार

पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, लातुर जिल्ह्यातील वासनगाव येथील दोघे चालकांसह पुणे येथे जुनी गाडी खरेदीसाठी आले होते. ती घेऊन गावी जात असताना या महामार्गावरील उतारावर गाडीचा टायर फुटून भीषण अपघात झाला. अपघातानंतर गाडीतील दोघांच्या डोक्याला व संपुर्ण शरीराला गंभीर जखमी होऊन ते जागीच ठार झाले. तर चालक गंभीर जखमी झाला आहे.

    पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जमखी झाला आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास पु्ण्यामधून जुनी गाडी खरेदी करुन गावी लातुरला जात असताना गाडीचा टायर फुटल्याने घडली.

    पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, लातुर जिल्ह्यातील वासनगाव येथील दोघे चालकांसह पुणे येथे जुनी गाडी खरेदीसाठी आले होते. ती घेऊन गावी जात असताना या महामार्गावरील उतारावर गाडीचा टायर फुटून भीषण अपघात झाला. अपघातानंतर गाडीतील दोघांच्या डोक्याला व संपुर्ण शरीराला गंभीर जखमी होऊन ते जागीच ठार झाले. तर चालक गंभीर जखमी झाला आहे.

    नंदकिशोर भाऊसाहेब जोगदंड, सौदागर दगडु उंप (वय.३५ रा.दोन्ही लातुर) यांचा अपघातांमध्ये मृत्यू झाला. तर चालक नवनाथ खंडु कांबळे (वय. २८ रा. लातुर) हा गंभीर जखमी झाला आहे.

    अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मोटार कारमध्ये अडलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु गाडीतील दोघे जागीच ठार झाले होते. तर चालकांस गाडीतून बाहेर काढण्यात आले. जखमीवर येथील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. तर पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.