मुंगसे शिवारात २० ते २५ जणांच्या टोळीने माजवली दहशत : लुटमार करीत नाशिकच्या दिशेने पलायन

मालेगाव : येथील मुंबई आग्रा महामार्गावरील माळीनगर (वाके), मुंगसे कांदा खरेदी - विक्री केंद्र, मुंगसे गाव, पाटणे फाटा परिसरात पिकअप वाहनातून आलेल्या सुमारे २० -२५ जणांच्या टोळीने हातात तलवारी, कोयता घेत दहशत माजवित लुटमार केल्याचा प्रकार काल गुरुवार दि.२९ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडला. या टोळीने माळीपाडा, वाकेफाटा, मुंगसे, कांदा मार्केट परिसरात हातात तलवारी व कोयता घेवून दहशत माजवत ग्रामस्थांच्या खिशातील पाकिट, पैसे, भ्रमणध्वनी हिसकावून धुळ्याच्या दिशेने पलायन करण्याचा प्रयल केला.

मालेगाव : येथील मुंबई आग्रा महामार्गावरील माळीनगर (वाके), मुंगसे कांदा खरेदी – विक्री केंद्र, मुंगसे गाव, पाटणे फाटा परिसरात पिकअप वाहनातून आलेल्या सुमारे २० -२५ जणांच्या टोळीने हातात तलवारी, कोयता घेत दहशत माजवित लुटमार केल्याचा प्रकार काल गुरुवार दि.२९ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडला. या टोळीने माळीपाडा, वाकेफाटा, मुंगसे, कांदा मार्केट परिसरात हातात तलवारी व कोयता घेवून दहशत माजवत ग्रामस्थांच्या खिशातील पाकिट, पैसे, भ्रमणध्वनी हिसकावून धुळ्याच्या दिशेने पलायन करण्याचा प्रयल केला. मात्र पाटणे फाट्यावर टोमॅटोच्या कॅरेटची भरलेली पिकअप पलटी झाल्याने वाहतूक कोंडी झाली. या वाहतूक कोंडीत वाहनधारकांना तलवारी व कोयत्याचा धाक दाखवत या टोळीने नाशिकच्या दिशेने पलायन केले. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान घटनास्थळी पोलीस यंत्रणा दाखल झाल्यानंतर रस्त्यावर पलटी झालेली पिकअप हटविल्याने वाहतूक सुरळीत झाली. रात्री उशिरा अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी व भारी अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरल्यामुळे पोलिसांनी संशयितांना अटक करावी, अशी मागणी केली जात आहे.