आठ दिवसात ठाकरे सरकारची तीसरी विकेट पडणार; चंद्रकांत पाटलांचा विश्वास

देवेंद्र फडणवीस यांच्याशी शनिवारी, रविवारी कडक आणि इतर दिवशी मिनी लॉकडाउन करु अशी चर्चा झाली. पण प्रत्यक्षात पूर्ण लॉकडाउनचं परिपत्रक काढलं. भाजपा हे सहन करणार नाही,” असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिला.

    पुणे : परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपानंतर आता हा तपास सिबीआयने हाती घेतल्यांन अनिल देशमुखांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर राज्याचं राजकारण चांगलचं तापत चाललं आहे. याचं पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

    चंद्रकांत पाटील काय म्हणाले ?

    “मंत्र्यांनी काही केलं नाही असं खोटं बोलत आहात. कोर्टाने ठोकलं की राजीनामा घेत आहात, एक नाही आता दोन राजीनामे झाले आणि येत्या आठ दिवसांत तिसरा राजीनामा होणार आहे. काल एकाने चांगली कमेंट केली की ३६ बॉलमध्ये दोन विकेट आणि उरलेल्या विकेटचं काय. उरलेल्यांची रांगच लागणार आहे. तुमच्या कर्माने तुम्ही मरणार आहात. पण सर्वसामान्यांचं नुकसान करु नका,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

    २०२४ मध्ये सगळ्या जागा भाजपा स्वबळावर लढवणार

    तसेचं पुढे बोलतांना त्यांनी भाजपच्या पुढील रणनिती बद्दलही त्यांनी भाष्य केलं आहे. म्हणाले की, २०१४ मध्ये महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत १२२ जागा आपल्याला मिळाल्या. त्यावेळेला आपण एकटे लढूनदेखील १ कोटी ४७ लाख मतं मिळाली. २०१९ मध्ये आपल्याला १६४ जागा लढण्यासाठी मिळाल्या तरी १ कोटी ४२ लाख मतं मिळाली. १०० जागा कमी लढवूनदेखील जर आपण १ कोटी ४२ लाख मतं मिळवू शकतो तर २८८ जागा मिळाल्यानंतर दोन कोटींचा टप्पा पार करु शकतो. २०२४ मध्ये सगळ्या जागा लढवत स्वबळावर सरकार आणायचं आहे,” असा निर्धार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

    राज्य सरकारकडून लॉकडाऊनबाबत फसवणूक

    तसेचं पाटील यांनी लॉकडाऊनवरुनही राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकारकडून फसवणूक झाली असून लोक त्यांना माफ करणार नाहीत. देवेंद्र फडणवीस यांच्याशी शनिवारी, रविवारी कडक आणि इतर दिवशी मिनी लॉकडाउन करु अशी चर्चा झाली. पण प्रत्यक्षात पूर्ण लॉकडाउनचं परिपत्रक काढलं. भाजपा हे सहन करणार नाही,” असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिला. “नियमावली करताना सर्वसामान्य जगणार कसा हेदेखील पाहिलं पाहिजे. मातोश्रीत बसून लॉकडाउन करणं सोपं आहे,” अशी टीका यावेळी त्यांनी केली.