राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर सत्तापक्षावर टीका करण्यासाठी विरोधी पक्षनेत्यांना आयते कोलित मिळाले आहे. यात काही जणांनी मुंडे यांच्या पदाचा राजीनामा मागण्याचा सूर आवळला आहे. ज्यामध्ये भाजप नेते निलेश राणे यांचाही समावेश आहे. यावर बोलताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निलेश राणे यांचा खपसून समाचार घेतला असून त्या निलेशच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, असे म्हणत त्यांनी राणेपुत्राची खिल्ली उडवली.

पुणे (Pune).  राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर सत्तापक्षावर टीका करण्यासाठी विरोधी पक्षनेत्यांना आयते कोलित मिळाले आहे. यात काही जणांनी मुंडे यांच्या पदाचा राजीनामा मागण्याचा सूर आवळला आहे. ज्यामध्ये भाजप नेते निलेश राणे यांचाही समावेश आहे. यावर बोलताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निलेश राणे यांचा खपसून समाचार घेतला असून त्या निलेशच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, असे म्हणत त्यांनी राणेपुत्राची खिल्ली उडवली.

इतके क्रिमिनल मिळून एका जेलमध्ये नसतील तितके एका पक्षात असल्याचा टोला भाजप नेते निलेश राणे पवारांनी लगावला होता. यावर आता अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते काही बोलतात आणि मी त्यावर बोलायचे का? पण एक सांगतो त्या निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याचे म्हणत अजित पवार यांनी निलेश राणेंच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला.

तत्पूर्वी निलेश राणे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, काय चाललंय महाराष्ट्रात? मुंबईचे सहपोलिस आयुक्त एका बलात्काराच्या मॅटरसाठी एका पक्षाच्या नेत्याला कसे भेटू शकतात आणि ते पण त्यांच्या घरी? हा तर केस झाकायचा अजेंडा दिसतो. अशाने पोलिसांवरील विश्वास उडेल लोकांचा. सामान्य लोकांसाठी ही सुविधा आहे का हे पण आयुक्तांनी सांगावं.

त्याचबरोबर नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्यावर झालेल्या कारवाईचे श्रेय निलेश राणे यांनी यावेळी नरेंद्र मोदींना दिले आहे. मोदी साहेबांमुळे डिजिटल पेमेंट करायची लोकांना सवय झाली आणि डिजिटल पेमेंटमुळे नवाब मलिक यांचा जावई ड्रग्जच्या लफड्यात पकडला गेल्याचे त्यांनी आपल्या दूसऱ्या ट्विटमध्ये म्हटले. तर राष्ट्रवादीत चाललंय काय?? इतके क्रिमिनल मिळून एका जेलमध्ये नसतील तितके एका पक्षात असल्याचा टोलाही यावेळी त्यांनी लगावला आहे.