‘त्या’ महिलेची कोरोना चाचणी निगेटिव्ह

पुणे : साेमवारी पक्षनेत्यांच्या बैठकीस उपस्थित राहीलेली एक महीला पदाधिकाऱ्याचा काेराेना चाचणी अहवाल निगेटिव्ह अाल्याने इतर पदाधिकाऱ्यांचा जीव भांड्यात पडला अाहे. या महीला पदाधिकाऱ्याच्या पतीला

पुणे : साेमवारी पक्षनेत्यांच्या बैठकीस उपस्थित राहीलेली एक महीला पदाधिकाऱ्याचा काेराेना चाचणी अहवाल निगेटिव्ह अाल्याने इतर पदाधिकाऱ्यांचा जीव भांड्यात पडला अाहे. या महीला पदाधिकाऱ्याच्या पतीला काेराेनाची बाधा झाल्याने िचंता निर्माण झाली.

महापाैर मुरलीधर माेहाेळ यांच्या उपस्थितीत साेमवारी पक्षनेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीस सर्व पक्षाचे गटनेते उपस्थित हाेते. या महीला पदाधिकारी उपस्थित हाेत्या. या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर या महीला पदाधिकाऱ्यांचे पती काेराेना बाधित असल्याची माहीती पुढे अाली हाेती. यामुळे बहुतेक पदाधिकाऱ्यांसमाेर िचंता निर्माण झाली हाेती. या महीला पदाधिकाऱ्याची काेराेना चाचणी केली गेली, त्यांचा अहवाल नेगेटिव्ह अाल्याने बैठकीस उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांचा जीव भांड्यात पडला अाहे.

काेराेनामुळे प्रतिबंिधत केलेल्या भागांंत तसेच शहराच्या इतर भागांत सुरू असलेल्या मदतकार्यात या महीला पदाधिकाऱ्याच्या पतीचा सहभाग हाेता. याकालावधीत त्यांचा काेराेनाग्रस्ताशी संपर्क अाल्याने त्यांना लागण झाल्ाी.