संशयाच्या भूताने उद्ध्वस्त केला १३ वर्षाच्या संसार ; पती पत्नीसोबत केले असे काही की वाचून तुम्हालाही बसेल धक्का

बाहेर घरकामासाठी जाणाऱ्या पत्नीवर योगेश सतत संशय घेत होता. त्यातून त्यांच्यामध्ये अनेकदा जोरदार भांडणंही झाली होती. पण काल रात्री घरातले सर्वजण शांत झोपल्यानंतर, योगेशने पत्नी उषाचा ओढणीने गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

    पुणे: संशयाचे भूत एकदा का डोक्यात शिरले के होत्याचे नव्हते व्हायला वेळ लागत नाही. अशी हृदयपिळवटून टाकणारी घटना पुण्यातील चंदननगर परिसरात घडली आहे. लग्नानंतर १३ वर्षांनी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेण्याचेभूत पतीच्या डोक्यात शिरले आणि संसार उद्ध्वस्त झाला. मग रात्रीचे जेवण करून घरात सगळेजण झोपले असताना पतीने चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा ओढणीनं गळा आवळून खून केला आहे. त्यानंतर स्वत: ही गळफास घेऊन पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मात्र या सगळ्या घटनेत निरागस मुलांना आई वडिलांच्या मृत्यूचा मोठा धक्का बसला आहे.

    आई -वडिलांचे मृतदेह बघून मुलांनी टाहो फोडला, तेव्हा शेजारच्या लोकांनी धाव घेतली, त्यांनतर ही घटना उघडकीस झाली. हत्या झालेल्या महिलेचं नाव उषा योगेश गायकवाड असून आरोपी मृत पतीचं नाव योगेश गायकवाड असं आहे. या दोघांचं तेरा वर्षापूर्वी लग्न झालं होतं. काही दिवस सुखात गेल्यानंतर मागील काही दिवसांपासून त्यांच्यात वादाला सुरुवात झाली होती.

    गेल्या दोन वर्षापासून योगेश बेरोजगार होता. त्याच्या हाताला काही काम नसल्याने मृत पत्नी उषा घरकाम करून संसाराचा गाडा हाकलत होती. बाहेर घरकामासाठी जाणाऱ्या पत्नीवर योगेश सतत संशय घेत होता. त्यातून त्यांच्यामध्ये अनेकदा जोरदार भांडणंही झाली होती. पण काल रात्री घरातले सर्वजण शांत झोपल्यानंतर, योगेशने पत्नी उषाचा ओढणीने गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.