मंचर पोस्ट कार्यालयात पोस्ट मास्तर नसल्याने आर्थिक व्यवहार थंडावले

मंचर : आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील पोस्ट कार्यालयातील पोस्ट मास्तर पद सद्यस्थितीत रिक्त असल्याने कार्यालयातील आर्थिक व्यवहार थंडावले आहेत. पोस्ट मास्तरांची तातडीने नियुक्ती करावी,अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मंचर : आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील पोस्ट कार्यालयातील पोस्ट मास्तर पद सद्यस्थितीत रिक्त असल्याने कार्यालयातील आर्थिक व्यवहार थंडावले आहेत. पोस्ट मास्तरांची तातडीने नियुक्ती करावी,अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मंचर पोस्ट कार्यालयाअंतर्गत ५ गावांचा संपर्क येतो. येथील पोस्ट मास्तर सैद यांची अवसरी खुर्द येथे बदली झाल्यानंतर एम. टी. शेलार यांनी पदभार स्वीकारला. परंतु त्यांना कोरोनाचा आजार झाल्याने ते रजेवर गेले. त्यांच्या जागेवर एन.डी.आयनिले यांनी पदभार स्वीकारला. परंतु त्यांचे वडील आजारी पडल्यामुळे ते रजेवर गेल्याचे येथील पोस्ट कार्यालयातील कर्मचाऱ्याने सांगितले. पोस्ट मास्तर पद रिक्त असल्याने सोमवार (दि.१२) पासुन आर्थिक देवाणघेवाण बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.

-तातडीने पोस्ट मास्तरांची नियुक्ती करावी
ज्येष्ठ नागरिक सोमवारपासुन पैसे काढण्यासाठी येत आहेत. परंतु पोस्टमास्तर नसल्याने पर्यायी व्यवस्था पोस्ट खात्याने न केल्याने येथे नागरिकांना चकरा माराव्या लागत आहे. तातडीने पोस्ट मास्तरांची नियुक्ती करावी,अन्यथा आंदोलन करावे लागेल,असा इशारा देण्यात आला आहे.