माझ्यावरील आरोपींची सखोल चौकशी करावी : माजी खासदार शिवाजीराव आढळराव

दिलीप मोहिते यांना त्यांचे सहकारी स्व. सुरेश गोरे व शरद बुट्टे यांना संभाळता आले नाही. विमानतळ पुन्हा आले तर माझा पाठिंबा राहील. महाविकास आघाडीत मला पुन्हा खासदारकी नाही मिळाली तरी चालेल परंतु शिवसेनेला कायम सन्मानपूर्वक वागणूक मिळालीच पाहिजे, अशी आढळराव यांनी ईच्छा व्यक्त केली. 

    राजगुरूनगर : खेड घाट लोकार्पण कार्यक्रमात खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार दिलीप मोहिते यांनी केलेल्या आरोपींची शासकीय यंत्रणेने सखोल चौकशी करावी असे जाहीर आव्हान माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिले. रविवारी (दि. १८) त्यांच्या लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथील निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हवेत बोलू नये, पुरावे द्यावेत असे आढळराव यांनी राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांना सुनावले.

    पुणे जिल्ह्यात महाविकास आघाडीत राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नेत्यांमुळेच बिघाडी सुरु झालीय. नारायणगाव व खेडच्या बाह्यवळणाच्या उद्घाटनप्रसंगी जाहिर वक्तव्यानंतर बिघाडीचं चित्र जाहिरपणे केलं गेलं. महाविकास आघाडीत तीन पक्ष एकत्र असताना बाह्यवळणाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्र्यांना डाववले गेलेच पण मलाही साधा फोन केला नाही. कोल्हेनी जेवढं स्क्रिप्ट दिलं तेवढंच वाचावे अशा शब्दात माजी खासदार शिवाजी आढळराव यांनी कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर तोंडसुख घेतले.

    आढळराव पुढे म्हणाले की मी खासदार असताना लोकसभेत भांडून २०१८ ला माझ्या पाठपुराव्यामूळेच या महामार्गाच्या कामाचा पाठपुरावा झाला. मार्च २०१९ मध्ये भूमिपूजन केलं. माझं श्रेय असताना मला डावललं जात आहे. आता मी खासदार नाही ठीक आहे.पण मला उदघाटनाला किमान फोन तरी करायला हवा होता मुख्यमंत्री यांचा फोटो तरी जाहिरातीत वापरायला पाहिजे होता. पुणे जिल्ह्यात सगळ्यात जास्त बिघाडी इथले राष्ट्रवादीचे नेते अमोल कोल्हे व दिलीप मोहिते करतात.

    दिलीप मोहिते यांना त्यांचे सहकारी स्व. सुरेश गोरे व शरद बुट्टे यांना संभाळता आले नाही. विमानतळ पुन्हा आले तर माझा पाठिंबा राहील. महाविकास आघाडीत मला पुन्हा खासदारकी नाही मिळाली तरी चालेल परंतु शिवसेनेला कायम सन्मानपूर्वक वागणूक मिळालीच पाहिजे, अशी आढळराव यांनी ईच्छा व्यक्त केली.