सक्रीय रुग्णसंख्या तीन हजाराच्याजवळ ; पुणेकरांनी नियमांचे पालन करणे आवश्यक

शहरात गेल्या चोवीस तासात  ३३१ नवीन रुग्ण

    पुणे : शहरातील काेराेनाच्या सक्रीय रुग्णसंख्या तीन हजाराच्याजवळ पाेचली आहे. यामुळे गर्दी करणाऱ्या पुणेकरांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. गेल्या चाेवीस तासांत काेराेनामुक्त हाेणाऱ्यांच्या तुलनेत काेराेनाबाधित रुग्णांची संख्या आढळून येण्याचे प्रमाण टिकून राहीले आहे.

    गेल्या चाेवीस तासांत ६ हजार ९९ जणांची चाचणी केली गेली. यामध्ये ३३१ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर २५३ रुग्ण हे काेराेनामुक्त झाले आहे. शहरातील आठ जणांसह एकुण १३ जणांचा मृत्यू झाला आहे. निर्बंध शिथिल केल्यानंतर पुणेकर रस्त्यावर गर्दी करू लागले आहेत. गेल्या काही दिवसांत चाचण्यांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. काेराेनामुक्त हाेणाऱ्यांच्या तुलनेत काेराेना बाधित जास्त आढळून येत असल्याने सक्रीय रुग्णांची संख्या हळू हळू वाढत २ हजार ९४१ पर्यंत पाेचली आहे. सक्रीय रुग्णांपैकी २४४ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. आजपर्यंत शहरात ४ लाख ८० हजार ९१३ जणांना काेराेनाची लागण झाली हाेती, त्यापैकी ४ लाख ६९ हजार ३३६ जणांनी काेराेनावर मात केली आहे. तर ८ हजार ६३६ जणांचा मृत्यू झाला आहे.