ग्रामीण भागात कोरोनाचे संकट रोखण्यात प्रशासन यशस्वी

भोर येथे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची माहीती भोर : सर्वच विभागांनी चांगले काम केल्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचे मोठे संकट होते. परंतू ते रोखण्यात प्रशासन यशस्वी

 भोर येथे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची माहीती

 भोर :  सर्वच विभागांनी चांगले काम केल्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचे मोठे संकट होते. परंतू ते रोखण्यात प्रशासन यशस्वी झाल्याची माहीती जिल्हाधिकारी नवळ किशोर राम यांनी दिली. तरीही करोनाचा धोका कमी झाला नाही त्यामुळे येणाऱ्या काळांतही अधिक काम करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. येथील पंचायत समितीच्या सभागृहांत करोना, खरीप हंगाम, पिक कर्ज वाटप, खेडशिवापूर टोलनाका आदी विषयांवर प्रशाकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना राम यांनी ही माहीती दिली.यावेळी आमदार संग्राम थोपटे, जिल्हा ग्रामीण पोलीस अधिक्षक संदीप पाटील,उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार अजित पाटील,गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, उपजिल्हा रूग्णालयाचे अधिक्षक डॉ.दत्तात्रय बामणे,तालुका वैदयकीय अधिकारी डॉ.सुनिल क-हाळे, मुख्याधिकारी डॉ.विजयकुमार थोरात आदी उपस्थित होते.राम म्हणाले, करोनाच्या कालावधीमध्ये दोन लाखापेक्षा अधिक नागरिक बाहेरून जिल्हयाच्या ग्रामीण भागांत आले आहेत. त्यांची आरोग्य तपासणी,नोंदी घेणे ही कामे आरोग्य, महसूल, पोलीस या विभागांनी समन्वयाने काम केल्यामुळे करोनाचे रोखण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले. भोर तालुक्यात करोनाचे काम अतिशय चांगले झाल्याचे ते म्हणाले.पिक नुकसानीचे पंचनामे झालेले आहेत.सरकारकडून अनुदान आल्यानंतर नुकसान भरपाईच्या रकेमेचे वाटप केले जाईल. पिक कर्जाचे वाटप समाधानकारक झाले नसल्याचे दिसत आहे तर युरीयाची थोडी कमतरता आहे,त्याबाबत संबधीतांशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. खेड शिवापूर टोल नाक्यावरील सुरू असलेल्या तक्रारी संदर्भात गुरूवारी पुण्यात सर्व संबधितांची बैठक अयोजित केली असल्याचे त्यांनी सांगितले.तालुक्यातील कोंढरी येथील नागरिकांना कोणतीही अडचण येणार नाही याची खबरदारी प्रशासन घेण्यात येईल. तशा आवश्यक त्या सूचना सर्वांना दिल्याचे ते म्हणाले. बैठकीनंतर त्यांनी  कोंढरी येथील ग्रामस्थांची भेट घेउन परिस्थितीची माहीती घेतली.