चासकमान पाण्यासाठी झालेले आंदोलन चुकीचे अशोक पवार यांचे मत

शिक्रापूर: चासकमान केनॉल चे पाणी मिळविण्यासाठी करंदी येथे काही शेतकऱ्यांनी आंदोलन केले आहे, मात्र ते आंदोलन चुकीचे असल्याचे मत शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी व्यक्त केले आहे.

 शिक्रापूर: चासकमान केनॉल चे पाणी मिळविण्यासाठी करंदी येथे काही शेतकऱ्यांनी आंदोलन केले आहे, मात्र ते आंदोलन चुकीचे असल्याचे मत शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी व्यक्त केले आहे.

करंदी (ता. शिरूर) येथे काही शेतकऱ्यांनी चासकमानचे पाणी मिळविण्यासाठी आंदोलन केले असताना त्यांनतर चासकमान विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दहा मी रोजी पाणी सोडण्याचे आश्वासन दिले असताना अचानक पाणी सोडले जाणार नसल्याचे कळविले त्यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी चासकमानच्या केनॉलवर जात पाण्याचा ताबा घेत त्या ठिकाणी उद्रेक केला अखेर पोलीस बंदोबस्तात शेतकऱ्यांनी घेतलेले पाणी बंद करावे लागले काही काळ तणाव निराम झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी एकवीस मी रोजी पाणी सोडणार असल्याचे सांगितले. त्यांनतर चासकमान केनॉलला पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असताना आज शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी सदर ठिकाणची पाहणी केले. यावेळी चासकमान विभागाचे कार्यकारी अभियंता शेटे, पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, राष्ट्रवाडीचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे यांसह आदी उपस्थित होते. त्यांनतर शिक्रापूर येथे पत्रकारांशी बोलताना आमदार अशोक पवार बोलत होते. यावेळी बोलताना सध्या कोरोना विरोधात सर्वजन लढत असताना शेतकऱ्यांनी वाद करणे चुकीचे असून शेतकऱ्यांनी केलेले आंदोलन चुकीचे असल्याचे आमदार अशोक पवार यांनी सांगितले आहे. तसेच चासकमानच्या पाण्याचे रब्बीचा हंगामातील पंधरा दिवसाचे पाणी आपण वाचविले असून ते उन्हाळ्यासाठी शिल्लक ठेवले आहे. हे पाणी पन्नास दिवसांपासून आपल्या तालुक्याला सोडलेले असून खालील भागातील काही शेतकऱ्यांना अद्याप पाणी मिळालेले नाही.
-पाणी योग्य पद्धतीने पुरविले जाणार
न्हावरा, निर्वी, निमोणे या भागामध्ये शेतकऱ्यांची पिके जळून चाललेले आहे त्यांना पाणी मिळणे गरजेचे आहे. सध्या धरणामध्ये मुबलक पाणीसाठा असून पाणी योग्य पद्धतीने पुरविले जाणार आहे. सध्या या केनॉलवर अनेक ठिकाणी तीनशे हून अधिक ठिकाणी विद्युत पंप सुरु असल्याचे दिसून आले आहे त्यामुळे त्या शेतकऱ्यांना सदर विद्युत पंप बंद करण्याची विनंती केली असल्याचे देखील आमदार अशोक पवार यांनी सांगितले.
 
केनॉलची गळती थांबविणे गरजेचे
चासकमान केनॉलमध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती होत असल्यामुळे पाणी वाया आहे, पुढील काळामध्ये अजितदादा पवार, जयंत पाटील,दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून केनॉलची गळती थांबविण्यासाठी काम केले जाणार असल्याचे देखील आमदार अशोक पवार यांनी सांगितले.