The Agriculture Act passed by the Center will not be repealed; Chandrakant Patil's direct reply to Sharad Pawar

केंद्राने कृषी कायद्यावर शहाणपणाची भूमिका घ्यावी असे  शरद पवारांनी म्हटले आहे, त्यावर प्रतिक्रीया देताना चंद्रकांत पाटील यांनी  म्हटले आहे की, केंद्र सरकारने केलेल्या कायद्यात नवीन काही बदल केला नाही. जे जुन्या कायद्यात होते तेच आहे. फक्त आता या कायद्याने शेतकऱ्यांना मार्केटच्या बाहेर माल विकण्याची परवानगी मिळाली जी आधी नव्हती असे  चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

पुणे : काहीही झालं, तरी हा कायदा रद्द होणार नाही असे म्हणत भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कृषी कायद्याबाबत भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे. सध्या  देशभरात केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांमुळे रणकंदान माजले आहे. हा कायदा रद्दच करावा या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. त्यामुळे आता चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण तापणार आहे.

या कायद्याविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचे अभूतपूर्व असं आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारमध्ये असणारा महत्त्वाचा पक्ष शिरोमणी अकाली दलानेही या कायद्यांचा निषेध करत सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही केंद्र सरकारला शहाणपणाची भूमिका घेण्याचा इशारा दिला आहे. त्यातच आता चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

केंद्राने कृषी कायद्यावर शहाणपणाची भूमिका घ्यावी असे  शरद पवार यांनी म्हटल्यानंतर त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट उत्तर दिले आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरुद्ध  दिल्लीच्या सीमेवर दहा दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असले तरीही हा कायदा रद्द होणार नाही असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. ते पुण्यात आजोयित कार्यक्रमात बोलत होते.

बाकी सर्व तरतुदी जुन्या कायद्यातीलच आहेत. MSP ची रक्कम देखील लिहून द्यायला सरकार तयार आहे. त्यामुळे त्यावरून आंदोलन, भारत बंद करणं हे चुकीच असल्याचेही ते म्हणाले.

केंद्राने कृषी कायद्यावर शहाणपणाची भूमिका घ्यावी असे  शरद पवारांनी म्हटले आहे, त्यावर प्रतिक्रीया देताना चंद्रकांत पाटील यांनी  म्हटले आहे की, केंद्र सरकारने केलेल्या कायद्यात नवीन काही बदल केला नाही. जे जुन्या कायद्यात होते तेच आहे. फक्त आता या कायद्याने शेतकऱ्यांना मार्केटच्या बाहेर माल विकण्याची परवानगी मिळाली जी आधी नव्हती असे  चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरुद्ध दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला महाविकास आघाडीने पाठिंबा दर्शवला आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘प्रश्न फक्त एमएसपीचा होता. केंद्र सरकार ऑन पेपर एमएसपीची रक्कम लिहून द्यायला तयार आहे. तरीही आपण आंदोलन करणार, भारत बंद करणार याला काही अर्थ नाही. केंद्र सरकारने केलेला कायदा रद्द होणार नाही. फक्त कायद्यात बदल केला जाईल.’ असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. कृषी कायद्यावरून विरोधी पक्षातील नेते राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. यावर चंद्रकांत पाटलांनी बोलताना भेटीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. लोकशाही आहे. लोकशाहीत भेट घेत असतील तर त्यांचे स्वागत आहे असा टोला त्यांनी लगावला आहे.