युतीसाठी केंद्रीय नेत्यांची परवानगी लागेल; मनसेबाबत भाजपा प्रदेशाध्यक्षांची भूमिका

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत (मनसे) युती करण्यासाठी केंद्रीय नेत्यांची परवानगी घ्यावी लागेल, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी स्पष्ट केले. महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये भाजपा मनसेसोबत जाणार असल्याच्या चर्चेवर त्यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत भाष्य केले. पाटील म्हणाले की, राज ठाकरे हे माझे आवडते राजकीय व्यक्तिमत्व आहे. ते स्पष्ट आणि खरे बोलतात. त्यांची अनेक भाषणे मी ऐकली आहे.

    पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत (मनसे) युती करण्यासाठी केंद्रीय नेत्यांची परवानगी घ्यावी लागेल, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी स्पष्ट केले. महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये भाजपा मनसेसोबत जाणार असल्याच्या चर्चेवर त्यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत भाष्य केले. पाटील म्हणाले की, राज ठाकरे हे माझे आवडते राजकीय व्यक्तिमत्व आहे. ते स्पष्ट आणि खरे बोलतात. त्यांची अनेक भाषणे मी ऐकली आहे.

    एक दोन दिवसात माझी राज ठाकरेंशी भेट होणार आहे. त्यावेळी चर्चा होणार आहे. मात्र, संभाव्य युतीमुळे देशाच्या राजकारणावर काय परिणाम होणार आहेत याबाबत केंद्राच्या नेत्यांशी चर्चा करावी लागणार आहे, असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

    युतीबाबतचा निर्णय आमच्या पक्षात चर्चा केल्यानंतर होणार किंवा नाही ते ठरेल असेही ते म्हणाले. मनसेच्या परप्रांतीयांबाबतच्या धोरणाला विरोध ही युतीतील अडचण दूर झाली तर मनसे आणि भाजपची युती होण्यासाठी मला निर्णय घेता येणार आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.