थेट बँक खात्यात जमा होणार कर्मचाऱ्यांच्या गणवेशाची रक्कम ; कर्मचारी महासंघाच्या मागणीला यश

आयुक्त राजेश पाटील यांनी कर्मचाऱ्यांना गणवेशाऐवजी त्याची रक्कम थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कर्मचारी गणवेशाबाबत यापुढे कोणतीही दिरंगाई अथवा हस्तक्षेप होणार नाही. गणवेशाची रक्कम थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

    पिंपरी: पिंपरी – चिंचवड महापालिका आस्थापनेवरील क्लास वन ते क्लास फोरमधील सर्व कर्मचाऱ्यांच्या गणवेशाची रक्कम थेट बँक खात्यात जमा होणार आहे. या रकमेत दरवर्षी १० टक्के वाढ होणार आहे. कर्मचारी महासंघाने केलेल्या मागणीला यश आले आहे.

    महापालिका कर्मचाNयांना दरवर्षी गणवेश, पावसाळी आणि हिवाळी साधने पुरविण्यात येतात. या कामी वेळोवेळी निविदा प्रसिद्ध केल्या जात. त्यात कायमच दिरंगाई होत असे. कर्मचाNयांना पुरवण्यात येणाऱ्या साधनांचा दर्जा सुमार असायचा. या सर्व प्रकारामध्ये कर्मचाऱ्यांची पिळवणूक होत. यातून कर्मचाऱ्यांची सोडवणूक करण्यासाठी कर्मचारी महासंघाने अध्यक्ष अंबर चिंचवडे यांच्या नेतृत्त्वाखाली महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. राज्य शासनाच्या डिसेंबर २०१६ च्या परिपत्रकाप्रमाणे लाभार्थ्यांची देय रक्कम थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे धोरण स्वीकारा, अशी मागणी अंबर चिंचवडे यांनी लावून धरली. त्यास अखेर यश आले आहे.

    puneकर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे म्हणाले, महापालिका इतिहासात पहिल्यांदाच असा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे कर्मचाऱ्यांना चांगल्या दर्जाचे गणवेश खरेदी करता येणार आहे. त्याचा त्यांच्या राहणीमानावर, कामकाजावरही चांगला परिणाम होणार आहे. या निर्णयाबाबत कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.